
मुहूर्त ठरला! सचिन तेंडुलकरच्या घरी वाजणार सनई चौघडे (photo Credit - X)
केव्हा आणि कुठे होणार लग्न?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नाचे विधी ३ मार्च २०२६ पासून सुरू होतील, तर मुख्य विवाह सोहळा ५ मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे. हा विवाह सोहळा मुंबईत एका खासगी समारंभात पार पडेल. या सोहळ्यासाठी कुटुंबिय, जवळचे मित्र आणि क्रिकेट विश्वातील काही मोजक्याच दिग्गजांना निमंत्रण असणार आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये या जोडप्याचा अत्यंत साध्या पद्धतीने साखरपुडा झाला होता.
Arjun Tendulkar, son of cricketer Sachin Tendulkar, is set to tie the knot with his fiancée Saaniya Chandhok on March 5. The couple got engaged in an intimate ceremony in August 2025.#ArjunTendulkar #SachinTendulkar #PuneTimes pic.twitter.com/6KnE09eDt2 — Pune Times (@PuneTimesOnline) January 7, 2026
कोण आहे सानिया चांडोक?
अर्जुनची होणारी पत्नी सानिया चांडोक ही एक यशस्वी उद्योजिका आहे. सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. ती एका लोकप्रिय ‘पेट केअर’ (Pet Care) ब्रँडची मालक आहे. सानिया गेल्या अनेक वर्षांपासून तेंडुलकर कुटुंबाच्या जवळ असून तिचे आणि अर्जुनचे नाते जुने आहे.
IND U19 vs SA U19: 2026 मध्येही वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ कायम! 63 चेंडूत ठोकले शतक
क्रिकेटच्या मैदानातही नवी इनिंग!
२०२६ हे वर्ष अर्जुनसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. लग्नबंधनात अडकल्यानंतर अर्जुन आयपीएल २०२६ च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळताना दिसणार आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा भाग होता, मात्र नुकतेच त्याचे लखनौ संघात ट्रेडिंग करण्यात आले आहे.
अर्जुन तेंडुलकरची आतापर्यंतची कारकीर्द
अर्जुन सध्या गोवा संघाकडून खेळतो. त्याने आतापर्यंत २२ प्रथम श्रेणी, २३ लिस्ट ए आणि २९ टी-२० सामने खेळले आहेत. २०१३ मध्ये मुंबई इंडियन्ससोबत पदार्पण करणाऱ्या अर्जुनने आतापर्यंत ५ आयपीएल सामन्यांत ३ विकेट्स घेतल्या आहेत.
IND U19 vs SA U19: 2026 मध्येही वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ कायम! 63 चेंडूत ठोकले शतक