Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरळी डोम येथे रंगणार Pro Govinda Season 3 चा अंतिम सामना! स्पर्धेचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर ख्रिस गेल राहणार उपस्थित..  

प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामन्याचा थरार वरळी डोम येथे ऑगस्ट महिन्यात तीन दिवस रंगणार आहे. अंतिम स्पर्धेत राज्यभरातील १६ गोविंदा पथकं आमनेसामने  उभे ठाकणार आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 07, 2025 | 05:03 PM
The final match of Pro Govinda Season 3 will be held at Worli Dome! The tournament's brand ambassador Chris Gayle will be present.

The final match of Pro Govinda Season 3 will be held at Worli Dome! The tournament's brand ambassador Chris Gayle will be present.

Follow Us
Close
Follow Us:

Pro Govinda Season 3 : चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते अशा प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामन्याचा थरार वरळी डोम येथे ७, ८, ९ ऑगस्ट या तीन दिवसात रंगणार आहे. अंतिम स्पर्धेत राज्यभरातील १६ गोविंदा पथकं आमनेसामने  उभे ठाकणार आहेत. थरांवर थराचा हा रोमहर्षक खेळ प्रेक्षकांना अनुभवता येणारा आहे. प्रो गोविंदा सीझन ३ चा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल असणार आहे. ख्रिस गेलच्या उपस्थितीमुळे प्रो गोविंदा सीझन ३ आणखी ग्लोबल होणार आहे. तसेच खेळाडूंना प्रेरणा देखील मिळेल, हा खेळ केवळ आपल्या देशा पुरता मर्यादित न राहता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा : Ind w vs Eng w : महिला क्रिकेट संघाचे India House मध्ये जंगी स्वागत; जेमिमा रॉड्रिग्जने गायले गीत

प्रो गोविंदा सीझन ३ मध्ये एकूण दीड कोटींची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये स्पर्धेत प्रथम पारितोषिक ७५ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५० लाख रुपये, तृतीय पारितोषिक २५ लाख रुपये आणि प्रत्येक सहभागी संघांना प्रत्येकी ३ एक लाख रुपये पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत.

स्पर्धात्मक बोली प्रो गोविंदा लीगच्या बदलाचे प्रतीक : पुर्वेश सरनाईक

प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली की, “आजची स्पर्धात्मक बोली ही प्रो गोविंदा लीगच्या मोठ्या बदलाचे प्रतीक आहे. एकेकाळी केवळ उत्सवाचा भाग असलेली ही परंपरा आता एका व्यावसायिक साहसी खेळात बदलली आहे, ज्यामध्ये खेळाडूंकडे प्रचंड ताकद, शिस्त आणि सांघिक कौशल्य असणे आवश्यक आहे.”

तसेच सरनाईक पुढे म्हणाले की, “जागतिक क्रिकेटपटू ख्रिस गेल ब्रँड ॲम्बेसेडर झाल्याने लीगला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे. यामुळे आपल्या सांस्कृतिक परंपरेवर आधारित एका विश्वासार्ह क्रीडा व्यासपीठाचे स्थान अधिक मजबूत बनले आहे. तरुण गोविंदांना करिअरची संधी देऊन महाराष्ट्राचा हा वारसा देश आणि जगात पोहोचवणे, हा आमच्यासाठी एक अभिमानाचा टप्पा आहे.”

प्रो गोविंदा सीझन ३ मधील सहभागी टिम खालीलप्रमाणे

  1.  नागपूर निजान्स
  2. अलिबाग नाईट्स
  3. शूर मुंबईकर
  4. ठाणे टायगर्स
  5. मिरा भाईदर लायन्स
  6. नाशिक रेन्जर्स
  7. दिल्ली इगल्स
  8.  सुरत टायटन्स
  9. जयपूर किंग्स
  10. बंगळुरू ब्लेझर्स
  11.  हैदराबाद डायनामोज
  12. गोवा सर्फर्स
  13. वाराणसी महादेव असेंडर्स
  14. लखनऊ पँथर्स
  15.  नवी मुंबई स्ट्रायकर्स
  16. मुंबई फाल्कन्स योद्धा
हेही वाचा : IND Vs ENG : गिल सेनेचा एजबॅस्टन विजय हेवा वाटणारा; पाकिस्तानचा कित्येक वर्ष जुना विक्रम उध्वस्त; वाचा सविस्तर

 

Web Title: The final match of pro govinda season 3 will be held at worli dome chris gayle will be present

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 05:03 PM

Topics:  

  • Chris Gayle

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.