फोटो सौजन्य - सोशल मीडिया
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे समीकरण : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत थ्रिलचा तिसरा डोस पाहिला जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गुणतालिकेचे गणित पाहायला गेलं तर ही शर्यत आणखीनच मनोरंजक होत चालली आहे. महिनाभरापूर्वी, सर्वांच्या नजरा भारत आणि ऑस्ट्रेलियाकडे होत्या, कारण दोन्ही संघांनी बराच काळ अव्वल-२ स्थानांवर कब्जा केला होता. पण एका अपसेटनंतर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलचे संपूर्ण गणित चुकले आहे. आता भारत-ऑस्ट्रेलियासाठी फायनल खूप दूर वाटत आहे, पण एक संघ असा आहे जो अंतिम फेरीसाठी पात्र होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
WTC Final : भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कसा पोहोचणार? वाचा संपूर्ण समीकरण
न्यूझीलंडविरुद्ध ०-३ अशा पराभवानंतर भारताचा खेळ खराब झाला. यानंतर टीम इंडियाला फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका होता. पर्थ कसोटीतील विजयानंतर टीम इंडिया अव्वल स्थानावर होती, मात्र ॲडलेड कसोटीतील पराभवामुळे टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर घसरली. ऑस्ट्रेलियाने ६०.७१ टक्के गुणांसह अव्वल स्थान पटकावले. पण २४ तासांनंतर मोठी अपसेट समोर आली आहे आणि कांगारू टीम दुसऱ्या स्थानावर तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आली.
On the road to Lord’s for the #WTC25 Final?
Temba Bavuma says there’s more to do for the Proteas 🗣#SAvSLhttps://t.co/KpSCWAVfn1
— ICC (@ICC) December 10, 2024
दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आणि अंतिम फेरीच्या अगदी जवळ आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली आणि १० सामन्यांनंतर 63.33 टक्के गुणांसह पहिले स्थान पटकावले. त्यामुळे संघ अंतिम फेरीत पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आफ्रिकन संघ अंतिम फेरीपासून फक्त एक विजय दूर आहे आणि प्रोटीज संघाला डिसेंबरच्या अखेरीस त्यांच्या घरी पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा दिसत आहे.
World Chess Championship 2024 : वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या 11 व्या खेळानंतर गुकेशकडे पहिल्यांदाच आघाडी!
टीम इंडियाला अंतिम फेरी गाठण्याची एकच संधी आहे. अंतिम फेरीचे तिकीट काढण्यासाठी भारताला बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेतील उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत अडकली आहे. आता अंतिम फेरीची खरी लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना १४ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता भारताचा संघाला उर्वरित तीनही सामने जिंकणे अनिवार्य आहे. भारताच्या संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवून मालिकेत बरोबरी केली आहे. त्यामुळे आता दोन्ही संघासाठी पुढील सामना महत्वाचा असणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी सामन्याचे आयोजन गब्बा येथे करण्यात आले आहे.