फोटो सौजन्य - ChessBase India सोशल मीडिया
जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२४ : ग्रँड मास्टर डी गुकेश विश्वविजेता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना उत्कृष्ट खेळ सादर केला. सिंगापूर येथे सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या ११व्या फेरीत त्याने विद्यमान विश्वविजेत्या डी लिरेनविरुद्ध शानदार विजयाची नोंद केली. याआधी या दोघांमध्ये सलग ८ सामने ड्रॉ झाले होते. गुकेशने रविवारी अकराव्या फेरीत लिरेनचा पराभव करत जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आणि ६-५ अशी आघाडी घेतली. क्लासिकल फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या १४ फेऱ्यांच्या स्पर्धेत आता फक्त तीनच खेळ बाकी आहेत. या विजयासह भारतीय खेळाडूचे सहा गुण झाले तर चीनच्या खेळाडूचे पाच गुण झाले.
After 11 games at the World Chess Championship 2024, it is @DGukesh who leads 6-5 against Ding Liren! 3 more games are left – first to reach 7.5 points wins.
Game 12 will take place tomorrow, where Ding Liren will have the White pieces. What are your predictions? #DingGukesh pic.twitter.com/2nLN7rz7Rm
— ChessBase India (@ChessbaseIndia) December 8, 2024
जो खेळाडू प्रथम ७.५ गुण मिळवेल तो जागतिक चॅम्पियनशिपचा विजेता होणार आहे. अशाप्रकारे हा विजय 18 वर्षीय डी गुकेशसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. डिंग लिरेन वेळेच्या दबावाखाली होता. या दबावाखाली चीनच्या खेळाडूने चुका केल्या, ज्याचा फायदा घेत गुकेशने स्पर्धेतील आपला दुसरा विजय संपादन केला. सलग सात ड्रॉ आणि एकूण आठ ड्रॉनंतर गुकेशचा विजय झाला.
IND vs AUS : भारताची लाजिरवाणी कामगिरी, पाच दिवसांचा खेळ अडीच दिवसात संपला! WTC मुकुटही गमावला
गुकेशने लिरेनला आश्चर्यचकित केले. त्याने आपल्या रणनीतीनुसार ही हालचाल केली नाही असे दिसले आणि तसे करण्याचा तात्काळ निर्णय घेतला. अवघ्या पाच चालीनंतर गुकेशला एका तासाची आघाडी मिळाली आणि इतक्या महत्त्वाच्या सामन्यात अशा परिस्थितीतून बाहेर पडणे कठीण आहे.
गुकेश सर्वात तरुण विश्वविजेता बनणार असल्याने लिरेनवर कमी वेळेचे दडपण स्पष्टपणे दिसत होते आणि या परिस्थितीत त्याने चुका केल्या. चीनच्या खेळाडूने २८व्या चालीत मोठी चूक केली आणि सुरुवातीचा गेम जिंकून लिरेनने या स्पर्धेत आघाडी घेतली होती बरोबरीवर आणले. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये सलग सात गेम अनिर्णित राहिले. विश्वनाथन आनंदनंतर गुकेश भारताचा दुसरा विश्वविजेता बनू शकतो. तो विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला तर सर्वात तरुण खेळाडू विश्वविजेता बनेल.
आनंद महिंद्रा यांनी या विजयाची तुलना फुटबॉलशी केली. त्याने X वर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, “बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ११व्या गेममध्ये गुकेशच्या शानदार पुनरागमनानंतर सिंगापूरमध्ये घरातील गर्दी. बहुतेक देश त्यांच्या फुटबॉल संघांचा जसा उत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे आम्ही हा मनाचा खेळ साजरा करत आहोत. आवडते. अविश्वसनीय भारत.
The ‘home’ crowd in Singapore after @DGukesh’s incredible comeback victory in game 11 of the Chess World championship.
We cheer the same way for this cerebral sport as most countries cheer for their soccer teams.
Love it.Incredible India!
— anand mahindra (@anandmahindra) December 9, 2024