Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई इंडियन्सचा ताफा अलिबागमध्ये, रेडीसन रिसॉर्टमध्ये घेणार विश्रांती

गेटवे येथे बसने मुंबई इंडियन्स टीम मंगळवारी सकाळी दाखल झाली. त्यानंतर सर्व ताफा पीएनपी जलवाहतूकीने बसून मौज मजा करीत मांडवा येथे दाखल झाले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 19, 2024 | 03:02 PM
मुंबई इंडियन्सचा ताफा अलिबागमध्ये, रेडीसन रिसॉर्टमध्ये घेणार विश्रांती
Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग – भारत रांजणकर : आयपीएलचा रणसंग्राम २२ मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत आयपीएलमधील महत्वपूर्ण संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे. मुंबई इंडियन्स टीमला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी पूर्ण ताफा अलिबाग येथे रेडीसन रिसॉर्ट मध्ये मंगळवारी दाखल झाला आहे. दोन दिवस ही टीम रिसॉर्टमध्ये राहणार आहे. त्यामुळे मोठा बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. गेटवे येथून १२ जणांची टीम मांडवा येथे जलवाहतूकीने दाखल झाली आहे.

गेटवे येथे बसने मुंबई इंडियन्स टीम मंगळवारी सकाळी दाखल झाली. त्यानंतर सर्व ताफा पीएनपी जलवाहतूकीने बसून मौज मजा करीत मांडवा येथे दाखल झाले. त्यानंतर बसने टीम ही अलिबाग गोंधळपाडा येथील रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल झाली. यावेळी रिसॉर्ट प्रशासनाने टीमचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. एक दिवस मुंबई इंडियन्स टीमही अलिबागमध्ये रिसॉर्टला राहणार आहेत. त्यानंतर बुधवारी टीम झिराड येथे एका खाजगी फार्म हाऊसवर राहण्यास जाणार आहेत. हार्दिक पांड्या, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीलशान मदुशंका, गेराल्ड कोएत्झी, इशान किशन, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, ल्युक वूड आदींसह प्रशिक्षक ५२ जणांचा ताफा रेडिसन रिसॉर्ट मध्ये दाखल झाले आहेत.

मुंबई इंडियन्स टीम रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल झाल्यानंतर रिसॉर्ट मधील पर्यटकांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी लगबग सुरू होती. पीयूष चावला याच्यासोबत बच्चे कंपनीने फोटो यावेळी काढले.

Web Title: The mumbai indians team will rest at the radisson resort in alibaug mumbai indians hardik pandya indian premier league raigad mumbai mandwa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2024 | 03:02 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Indian Premier League
  • Mumbai
  • mumbai indians

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
4

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.