ऑक्टोबर महिन्यात विश्वचषक (World Cup) खेळण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ सध्या भारतीय दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळवण्यात येणार असून २८ सप्टेंबर पासून या सामन्यांना सुरुवात होणार आहे. मात्र भारत दौऱ्यावर असताना दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूंनी एका मंदिराला भेट दिल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
फोटोत असलेला खेळाडू हा दक्षिण आफ्रिका संघातील असून त्याचे नाव ‘केशव महाराज’ असे आहे. या फोटोमध्ये केशव महाराज हा भारतीय पारंपारिक पोशाखात दिसत आहे. त्यांने तिरुअनंतपुरममधील पद्मानंद स्वामी मंदिरात पूजा केली. यादरम्यानचा केशव महाराजने फोटो शेअर केला असून आणि कॅप्शनमध्ये, ‘जय माता दी’ असं म्हटलं आहे.
केशव महाराज (Keshav Maharaj) हा मूळचा भारतामधील उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपूरचा आहे. आफ्रिकेत राहूनही तो हिंदू रितीरिवाजांचे पालन करत असून तो हनुमानाचा मोठा भक्त आहे. केशव महाराजांचे पूर्वज १८७४ मध्ये भारतातून डर्बनमध्ये नोकरीच्या शोधात गेले होते आणि त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले.
केशव महाराजचा जन्म ७ फेब्रुवारी १९९० रोजी दक्षिण आफ्रिकेत झाला. केशव महाराजचे वडीलही दक्षिण आफ्रिकेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना २८ सप्टेंबरला तिरुवनंतपुरममध्ये होणार आहे. तेव्हा उद्याच्या मॅच करीता तिरुअनंतपुरम येतेच आला असताना केशवने आवर्जून मंदिराला भेट दिली.