
IND VS SA: 'Things aren't forgotten easily...' Temba Bavuma breaks silence on Bumrah's 'short' remark.
Temba Bavuma’s statement regarding his height: दक्षिण अद्रिका आणि भारत यांच्यात अलीकडेच कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळली गेली. कसोटी मालिकेत टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने भारताला क्लीन स्वीप केले, तर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकीकेला २-१ असा पराभव पत्करावा लागला आहे. त्यानंतरच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ३-१ असा दणदणीत पराभव केला. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान, काही वादग्रस्त विधाने आणि घटना देखील घडल्याचे दिसून आले. ज्यांची जागतिक क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली. अशाच एका घटनेत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा यांचा समावेश असून हे प्रत्यकरण देखील खूप गाजले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. यातील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला गेला होता. सामन्यादरम्यान, जसप्रीत बुमराहने त्याच्याविरुद्ध एलबीडब्ल्यू अपील दरम्यान टेम्बा बावुमाबद्दल एक वादग्रस्त टिप्पणी केली होती, जी स्टंप माइकवर स्पष्टपणे ऐकू देखील आली. या टिप्पणीमुळे सोशल मीडिया आणि क्रिकेट जगतात वाद निर्माण झाला होता.तथापि, त्यावेळी टेम्बा बावुमा यांनी या प्रकरणावर मौन बाळगले होते.
टेम्बा बावुमा यांनी प्रथमच या प्रकरणावर भाष्य केले आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या त्यांच्या कॉलममध्ये घडलेल्या घटनेचा संदर्भ देत त्याने लिहिले आहे की, त्या क्षणी त्यांना काय सांगितले गेले याची त्यांना पूर्ण जाणीव होती. बावुमा म्हणाला की, सामन्यानंतर ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या टिप्पणीबद्दल माफी देखील मागितली. बावुमाच्या मते, त्यावेळी मैदानावर काय बोलले गेले याबद्दल त्यांना माहिती नव्हती. नंतर त्याने त्यांच्या मीडिया मॅनेजरशी या प्रकरणाबद्दल बोलणी केली.
बावुमाने त्यांच्या कॉलममध्ये लिहिले की “क्रिकेटच्या मैदानावर बरेच काही बोलण्यात येते आणि आदर्श परिस्थिती म्हणजे ते तिथेच सोडून देणे.” तथापि, त्याने हे देखील मांनी केले की, अशा गोष्टी सहजासहजी विसरल्या जात नाहीत. बावुमा म्हणाला की, जर खेळाडूंची इच्छा असेल तर ते या अनुभवांचा प्रेरणा म्हणून देखील वापर केला जाऊ शकतो.
हेही वाचा : IPL 2026 : बलात्कार प्रकरणात यश दयालला दिलासा नाहीच; पॉक्सो न्यायालयाने जामीन फेटाळाला; RCB च्या चिंतेत वाढ