
विराट-रोहितची जबरदस्त क्रेझ.... अवघ्या ८ मिनिटात तिकिटांचा खेळ खल्लास! (Photo Credit - X)
कोहली-रोहितची क्रेझ
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्यांचे चाहते अजूनही कायम आहेत. म्हणूनच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याची सर्व तिकिटे अवघ्या आठ मिनिटांत विकली गेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या एकदिवसीय मालिकेत कोहली आणि रोहितच्या बॅटने हाहाकार उडवला होता.
दोघही जबरदस्त फाॅर्ममध्ये
विराटने टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला, तीनपैकी दोन सामन्यांमध्ये शतके आणि एका सामन्यात अर्धशतक झळकावले. दरम्यान, हिटमॅनने प्रोटीज गोलंदाजांनाही फटकारले. यापूर्वी, रो-को जोडीने ऑस्ट्रेलियन भूमीवर बॅटने वर्चस्व गाजवले होते.
न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बडोद्यातील बीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरा सामना १४ जानेवारी रोजी राजकोटमध्ये खेळला जाईल. इंदूरमधील होळकर स्टेडियमवर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाईल. एकदिवसीय सामन्यांनंतर, दोन्ही संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळतील. टी-२० मालिका २१ जानेवारीपासून सुरू होईल आणि शेवटचा सामना ३१ जानेवारीला होईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेचे वेळापत्रक:
| सामना | तारीख | ठिकाण |
| पहिली वनडे | ११ जानेवारी | बडोदा |
| दुसरी वनडे | १४ जानेवारी | राजकोट |
| तिसरी वनडे | १८ जानेवारी | इंदूर |