
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Statement by Rashid Latif : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मागील दोन वर्षापासून तणाव आणखीनच वाढला आहे. भारताच्या संघाने मागील वर्षी झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तानी खेळाडूसोबत हॅन्डशेक करण्यास नकार दिला होता त्यानंतर अजुनपर्यत कोणत्याही क्रिकेट खेळाडूने पाकिस्तानशी हात मिळवला नाही. २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी फारसा वेळ शिल्लक नाही. याआधी बांगलादेशच्या स्थळाचा वाद हा चर्चेचा विषय होता.
पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा दिला आणि नंतर स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. नंतर, पाकिस्तानी संघ टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध खेळू शकणार नाही अशा बातम्या समोर आल्या. पाकिस्तान सरकारचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. यापूर्वी, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रशीद लतीफ यांनी भारताविरुद्ध खेळणार नसल्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली होती.
पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज नुकताच भारताविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलला. तो म्हणाला, “जर सरकारने म्हटले की आम्ही भारताविरुद्ध खेळणार नाही, तर आयसीसीला ते मान्य करावे लागेल. जर त्यांनी तसे केले नाही, तर खऱ्या वाटाघाटी सुरू होतील.” भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना निश्चित झाला तर काय होईल असे विचारले असता, रशीद लतीफने उत्तर दिले, “आम्ही खेळणार नाही.”
रशीद लतीफने यापूर्वी पाकिस्तानला विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचा सल्ला दिला होता. तथापि, आता त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर यावर यू-टर्न घेतला आहे. तो म्हणाला की आता माघार घेणे निरर्थक आहे; हे आधीच करायला हवे होते. तो म्हणाला, “निर्णय घेण्याची वेळ निघून गेली आहे. प्रत्येक निर्णयासाठी एक वेळ असते. लोखंड गरम असताना हातोडा मारला जातो. तो वेळ गेल्या आठवड्यात आयसीसीच्या बैठकीत होता. आम्ही पाठिंबा दर्शविला. आम्ही त्यांच्या बाजूने मतदान केले. प्रकरण संपले आहे. जर आपण आता बहिष्कार टाकला तर त्याचा परिणाम असा होणार नाही.”
पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांनी टी-२० विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलले असेल, पण निवडकर्त्यांनी पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे. आता, पाकिस्तान संघातील सर्व खेळाडूंसाठी श्रीलंकेसाठी विमान तिकिटे बुक करण्यात आली आहेत असे वृत्त समोर येत आहे. या सर्व गोष्टींवरून असे दिसून येते की पाकिस्तान निश्चितच विश्वचषकात सहभागी होईल.