Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup Opening Ceremony: “नोरा फतेहीपासून बादशाहपर्यंत…”, वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये रंगणार ‘या’ स्टार्सची मैफल

टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध (USA) करणार आहे. या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांना एक अविस्मरणीय आणि डोळे दिपवणारा 'ओपनिंग सेरेमनी' अनुभवता येणार

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 06, 2026 | 08:59 PM
वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये रंगणार 'या' स्टार्सची मैफल (photo Credit- X)

वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये रंगणार 'या' स्टार्सची मैफल (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • नोरा फतेहीपासून बादशाहपर्यंत
  • वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये रंगणार ‘या’ स्टार्सची मैफल
T20 World Cup Opening Ceremony News: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे! आयसीसी (ICC) पुरुष T20 वर्ल्ड कप २०२६ चा थरार शनिवार, ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना जरी सह-यजमान श्रीलंका आणि नेदरलँड्स यांच्यात कोलंबोमध्ये खेळला जाणार असला, तरी टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध (USA) करणार आहे. या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांना एक अविस्मरणीय आणि डोळे दिपवणारा ‘ओपनिंग सेरेमनी’ (उद्घाटन सोहळा) अनुभवता येणार आहे.

म्युझिकल मेडले आणि ट्रॉफीची दिमाखदार एन्ट्री

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:०० वाजता या भव्य सोहळ्याला सुरुवात होईल. कार्यक्रमाची सुरुवात तरुण संगीतकार ऋषभ शर्मा आणि प्रख्यात ड्रमर शिवमणि यांच्या दमदार ‘म्युझिकल मेडले’ने होईल. त्यांच्या तालावर संपूर्ण वानखेडे स्टेडियम न्हाऊन निघेल. या सांगीतिक सादरीकरणानंतर, T20 वर्ल्ड कपची झळाळती ट्रॉफी एका खास आणि चित्तवेधक पद्धतीने मैदानात आणली जाईल.

ICC T20 World Cup: Badshah, Rishab Rikhiram Sharma, Nora Fatehi, Sivamani to perform at opening ceremony Read @ANI story | https://t.co/0UeGbFt21W#Badshah #RishabRikhiramSharma #WorldCup #Cricket #T20WorldCup pic.twitter.com/zSOwGTZ7fQ — ANI Digital (@ani_digital) February 6, 2026

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वीच भारताला झटका! सूर्या आर्मीचा ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर

रोहित शर्मा करणार वर्ल्ड कपचे उद्घाटन

२०२४ मध्ये भारताला विश्वविजेतेपद मिळवून देणारा माजी कर्णधार रोहित शर्मा या सोहळ्याचा मुख्य चेहरा असेल. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि रोहित शर्मा वर्ल्ड कप ट्रॉफीचे अधिकृत स्वागत करतील. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या २० देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २० लहान मुलांसह रोहित शर्मा T20 वर्ल्ड कप २०२६ सुरू झाल्याची अधिकृत घोषणा करेल. २०२४ चे विजेतेपद टिकवण्याची मदार आता सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर आहे.

लागणार बॉलिवूडचा तडका

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते पुन्हा एकदा वानखेडेवर पाहायला मिळेल. ट्रॉफीच्या आगमनानंतर स्टार रॅपर बादशाह आपल्या सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये जोश भरेल. त्यानंतर, बॉलिवूडची डान्स क्वीन नोरा फतेही आपल्या सह-कलाकारांसह एक हाय-व्होल्टेज डान्स परफॉर्मन्स सादर करेल. या रंगारंग कार्यक्रमानंतर आकाशात नयनरम्य आतिशबाजी केली जाईल. सामन्याची वेळ आणि प्रक्षेपण उद्घाटन सोहळा संपल्यानंतर बरोबर संध्याकाळी ७:०० वाजता नाणेफेक (Toss) होईल आणि ७:३० वाजता भारत विरुद्ध अमेरिका या सामन्याला सुरुवात होईल. घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघ विजयाने सुरुवात करण्यास उत्सुक आहे.

T20 World Cup मध्ये सर्वात वेगवान शतकाचा मान कोणाकडे? फक्त ‘इतक्या’ चेंडूत रचला इतिहास

Web Title: These stars will perform at the world cup opening ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Nora Fatehi
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Nora Fatehi च्या ‘सरके चुनर’ गाण्याची गायिका कोण? ९ वर्षांत ८० हून अधिक गाणी, आता करतेय ट्रोलिंगचा सामना
1

Nora Fatehi च्या ‘सरके चुनर’ गाण्याची गायिका कोण? ९ वर्षांत ८० हून अधिक गाणी, आता करतेय ट्रोलिंगचा सामना

‘माझी इमेज खराब…’, नोरा फतेहीचा ‘सरके चुनर’ गाण्यावरून यू-टर्न; म्हणाली, ”मी परफॉर्म…”
2

‘माझी इमेज खराब…’, नोरा फतेहीचा ‘सरके चुनर’ गाण्यावरून यू-टर्न; म्हणाली, ”मी परफॉर्म…”

‘सरके चुनर तेरी’ गाण्यावर बंदी; संसदेत गदारोळ, अश्विनी वैष्णव यांनी करून दिली नियमांची आठवण
3

‘सरके चुनर तेरी’ गाण्यावर बंदी; संसदेत गदारोळ, अश्विनी वैष्णव यांनी करून दिली नियमांची आठवण

Nora Fatehi आणखी अडचणीत! ‘अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या..’ म्हणत कंगना रणौतचा बॉलीवूडवर हल्लाबोल
4

Nora Fatehi आणखी अडचणीत! ‘अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या..’ म्हणत कंगना रणौतचा बॉलीवूडवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.