फोटो सौजन्य : X
क्वालिफायर 2 चा सामना आज खेळवला जाणार आहे त्यानंतर फक्त एकच सामना शिल्लक राहणार आहे तो म्हणजेच फायनल. त्याआधी ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये कोणकोणत्या खेळाडूंची अजूनही चान्स आहेत या संदर्भात जाणून घेऊया. पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आज क्वालिफायर 2 चा सामना रंगणार आहे याआधी टॉप 5 मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोणते खेळाडू आहेत या संदर्भात सविस्तर जाणून घ्या. ऑरेंज कॅपच्या शर्यतीवर नजर टाकली तर साई सुदर्शन याने 700 चा आकडा पार करून पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
साई सुदर्शन याने 15 सामन्यांमध्ये 759 धावा करून पहिल्या स्थानावर तो विराजमान आहे. त्याने या सिझनमध्ये एक शतक आणि सहा अर्धशतक झळकावले आहेत. तर दुसरा स्थानावर मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव हा आहे. सूर्यकुमार यादव याने या सीजनमध्ये कमालीचा फॉर्म दाखवला आहे त्याने या सीजन सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादव यांनी 15 सामन्यांमध्ये 673 धावा केल्या आहेत. त्याने पाच अर्धशतक देखील ठोकले आहेत. तिसऱ्या स्थानावर शुभमन गिल आहे त्याने 15 सामन्यात 650 धावा केल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सचा मिचेल मार्श हा चौथ्या स्थानावर आहे त्याने 13 सामन्यांमध्ये 627 धावा केल्या आहेत. बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली हा या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे बंगळुरूच्या संघाने फायनलमध्ये स्थान पक्के केल्यानंतर अजूनही विराट कोहलीला ऑरेंज कॅप मिळवण्याची संधी आहे त्याने आत्तापर्यंत 14 सामन्यांमध्ये 614 धावा केल्या आहेत.
आकाशने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, “सूर्यकुमार यादव थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्याने सलग १५ सामन्यांमध्ये २५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याची एक नजर ऑरेंज कॅपवर निश्चितच आहे. गेल्या सामन्यात सूर्याने या संघाविरुद्ध (पंजाब किंग्ज) खेळताना धावा काढल्या. तथापि, पंजाबने सूर्याविरुद्ध खूप चांगली रणनीती वापरली. त्याच्याविरुद्ध चेंडू मिड-ऑनच्या आत टाकण्यात आला. तिथे एक झेलही चुकला. यावेळीही पंजाब संघ सुनियोजित रणनीती घेऊन येईल. पण सूर्या सूर्या आहे, सूर्या चमकतो.” सूर्याने पंजाबविरुद्धच्या साखळी सामन्यात ३९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५७ धावा केल्या होत्या. तथापि, १८४/७ असा आकडा असूनही मुंबईचा ७ विकेटने पराभव झाला.
सूर्या व्यतिरिक्त, आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील ऑरेंज कॅपसाठी दावेदार आहे. तथापि, कोहली खूप दूर आहे. कोहली आणि सुदर्शनमध्ये १४५ धावांचा फरक आहे. तो यादीत पाचव्या स्थानावर आहे. आरसीबीने अंतिम फेरी गाठली आहे. अशा परिस्थितीत कोहली आता फक्त एकच सामना खेळणार आहे. दुसरीकडे, जरी सूर्या रविवारी खेळू शकला नाही, तरी जर मुंबई अंतिम फेरीत पोहोचली तर त्याला ऑरेंज कॅप जिंकण्याची आणखी एक संधी असेल.