
Pune Sports News
साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केपीआयटी संघाने २० षटकांत ९ बाद १४१ धावा उभारल्या. यात शुभम झापडेकर (३७ धावा, ३६ चेंडू, २ चौकार, २ षटकार), सोमेश मर्दाने (२९ धावा) आणि मंगेश पाटील (२७ धावा) यांनी उपयुक्त योगदान दिले. कॉग्निझंटकडून ओंकार गायकवाडने अत्यंत शिस्तबद्ध व भेदक मारा करत २४ धावांत ४ बळी टिपले, तर आनंद कोंडाने २९ धावांत २ गडी बाद केले.
Cricket News: खेळायचं तर रांगड्या पद्धतीनं! ‘या’ लीगमध्ये लाइफफिट क्रिकेट अकादमीचा सलग दुसरा विजय
विजयासाठी मिळालेल्या १४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कॉग्निझंटने १९.३ षटकांत ६ बाद १४३ धावा करत सामना ४ गडी राखून जिंकला. वामसी के. याने ४० धावांची (२६ चेंडू, २ चौकार, २ षटकार) तर मानस गोकवीने ३२ धावांची (२२ चेंडू, ५ चौकार) आक्रमक खेळी केली. केपीआयटीकडून शुभम सोनावणे (२-१६) आणि आलोक नागराज (२-२३) यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. भेदक गोलंदाजी करणारा ओंकार गायकवाड सामन्याचा मानकरी ठरला.
दुसऱ्या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या एसएसअँडसी ऍडव्हेंट संघाला २० षटकांत ७ बाद १३२ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून तारिक अन्सारी (३८ धावा, २५ चेंडू, १ चौकार, ४ षटकार) आणि मनीष सुपल (३३ धावा, २६ चेंडू, ६ चौकार) यांनी लढा दिला. यूबीएस पुणेकडून राजेश वर्माने २२ धावांत ३ बळी टिपले, तर प्रवीण सिंग व अंकित जैन यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला. १३३ धावांचे लक्ष्य यूबीएस पुणे संघाने १७.२ षटकांत अवघ्या २ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. प्रवीण सिंगने नाबाद ३७ धावांची (३१ चेंडू, ३ चौकार, २ षटकार) संयमी खेळी केली, तर त्याला अंकित जैनने ३३ धावांची (३३ चेंडू, १ चौकार, २ षटकार) उत्तम साथ दिली. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या प्रवीण सिंगला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
Cricket News: पुणे कॉर्पोरेट क्लॅशमध्ये TCS चा चौकार! सलग चौथ्या विजयासह स्पर्धेत दबदबा कायम
संक्षिप्त धावफलक
सामना १
केपीआयटी : २० षटकांत ९ बाद १४१ धावा (शुभम झापडेकर ३७, सोमेश मर्दाने २९, मंगेश पाटील २७, सुधीर काळे १५, आलोक नागराज १३; ओंकार गायकवाड ४-२४, आनंद कोंडा २-२९)
कॉग्निझंट : १९.३ षटकांत ६ बाद १४३ धावा (वामसी के. ४०, मानस गोकवी ३२, अजय झावरे १८, प्रियांशु बांग १७, मृदुल म्हात्रे १४; शुभम सोनावणे २-१६, आलोक नागराज २-२३)
निकाल : कॉग्निझंट ४ गडी राखून विजयी.
सामनावीर : ओंकार गायकवाड.
Ans: ‘पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीगमध्ये प्रवीण सिंगने अष्टपैलू कामगिरी केली.
Ans: ‘पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीग थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट मैदानावर सुरू आहे.