
आयपीएलच्या 38 व्या सामन्यात घडला थरार
अंगरीक्ष रघुवंशी विचित्ररित्या झाला आउट
केकेआरची निर्णयावर थेट नाराजी
Tata IPL 2026 OBS Wickets Process: काल कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात अटीतटीचा सामना पार पडला. कालच्या सामन्यात केकेआर विजय मिळवत प्ले ऑफमध्ये जाण्याच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र कालच्या सामन्यात एक नाट्यमय घडामोड घडली. केकेआरचा फलंदाज अंगरीक्ष रघुवंशी नाट्यमयरित्या आउट झाला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.
केकेआरचा तरुण फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याला ‘ऑबस्ट्रक्टिंग द फील्ड’ (Obstructing the Field – OBS) म्हणजेच फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्याच्या कारणावरून आउट देण्यात आले. आयपीएलच्या इतिहासात अशा प्रकारे बाद होणारा तो फार कमी फलंदाजांपैकी एक ठरला आहे.
नेमकं काय घडलं?
कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील ५ व्या षटकात ही घटना घडली. अंगक्रिशने चेंडू खेळून एक धाव घेण्यासाठी धाव घेतली. फील्डरने चेंडू पकडून नॉन-स्ट्रायकर एंडच्या दिशेने वेगाने फेकला. यावेळी रन पूर्ण करताना अंगक्रिशने आपली दिशा बदलली आणि थ्रो करण्यात आलेला चेंडू थेट त्याच्या पॅडला लागला.
‘OBS’ चा विळखा! आयपीएलमध्ये Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली चर्चेचा विषय; पहा Video
ANGKRISH RAGHUVANSHI ANGRY ON POOR UMPIRING 🤬 pic.twitter.com/DBJdg9HRP6 — Rohshh45 (@rohitfc58737) April 26, 2026
लखनऊच्या खेळाडूंनी तात्काळ अपील केले. मैदानातील पंचांनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला. विविध प्रकारचे रिप्ले पाहिल्यानंतर, थर्ड अंपायरने असा निष्कर्ष काढला की, अंगक्रिशने जाणीवपूर्वक आपली ‘रनिंग लाईन’ बदलली. बॉल स्टंपला लागू नये म्हणून अंगक्रिशने जाणीवपूर्वक आपली ‘रनिंग लाईन’ बदलली. नियमानुसार हे ‘फिल्डिंगमध्ये अडथळा’ आणणे असे समजले जाते, त्यामुळे त्याला आउट करण्यात आले.
काय सांगतो ‘OBS’ नियम?
क्रिकेटच्या नियम 37 नुसार, जर एखादा फलंदाज शब्द किंवा कृतीद्वारे जाणीवपूर्वक फिल्डिंगमध्ये अडथळा आणत असेल किंवा फील्डरचे लक्ष विचलित करत असेल, तर त्याला आउट दिले जाऊ शकते. रन घेत असताना मुद्दाम बॉलच्या मध्ये येणे हा नियमाचा भंग असल्याचे समजले जाते.
सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा लखनौवर विजय
IPL 2026 मधील 38 वा सामना आणि या हंगामातील ‘सुपर ओव्हर’चा समावेश असलेला पहिलाच सामना उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ येथील एकाना स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना दोन्ही संघांमध्ये अत्यंत रोमांचक ठरला आणि अखेरीस ‘सुपर ओव्हर’मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला. तत्पूर्वी, सामन्यात LSG चा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या निर्धारित 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावांची धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, लखनौ सुपर जायंट्सनेही 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा केल्या, ज्यामुळे सामना बरोबरीत सुटला. परिणामी, सामन्याचा निकाल ‘सुपर ओव्हर’मध्ये लावण्यात आला.