फोटो सौजन्य : X
ICC नवा नियम : आयपीएल 2025 चा 18 वा सिझन संपला यामध्ये आरसीबीच्या संघाने बाजी मारली. या 18व्या सिझनमध्ये बीसीसीआयने बाॅलला लाळ लावण्याचा नियम पुन्हा लागु केला होता. त्यामुळे गोलंदाजांना मोठा फायदा झाला. आता 13 जूनपासुन मेलबर्न क्रिकेट क्लब या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू या लीगमध्ये सामील झाले आहेत. मेलबर्न क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीने अलीकडेच नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. हा बदल सीमेवर चेंडू पकडण्याशी संबंधित आहे.
नवीन नियमांनुसार, सीमेवर ‘बनी हॉप’ आता बेकायदेशीर मानला जाणार आहे. ‘बनी हॉप’ म्हणजे जेव्हा एखादा खेळाडू सीमेबाहेर गेल्यानंतर हवेत उडी मारतो आणि चेंडू आत फेकून पकडतो. अशा परिस्थितीत, बाउंड्रीच्या आत राहून चेंडूला स्पर्श करणे हे आता कायदेशीर मानले जाणार आहे. हा बदल या महिन्यात आयसीसीच्या खेळण्याच्या परिस्थितीत केला जाईल आणि ऑक्टोबर २०२६ मध्ये एमसीसीमध्ये लागू केला जाणार आहे असे म्हटले जात आहे.
नवीन नियमानुसार, उडणारा क्षेत्ररक्षक जेव्हा सीमारेषेच्या बाहेर असेल तेव्हाच चेंडूला स्पर्श करू शकतो. झेल पूर्ण करण्यासाठी क्षेत्ररक्षकाला पुन्हा मैदानात यावे लागेल. पूर्वीच्या नियमानुसार, क्षेत्ररक्षक चेंडूच्या संपर्कात आल्यावर हवेत असताना, सीमारेषेच्या बाहेर जाऊन अनेक वेळा हवेत चेंडू मारू शकत होता. बीबीएल २०२३ दरम्यान मायकेल नेसरने असाच झेल घेतल्यानंतर हा नियम वादाचा विषय बनला .
The MCC has changed the law to make catches like this ‘bunny hop’ one from Michael Neser illegal. In short:
If the fielder’s first touch takes them outside the boundary, their *second* touch must take them back inside the field of play.
Basically, you’re no longer allowed to… pic.twitter.com/1jaqAev0hy
— 7Cricket (@7Cricket) June 14, 2025
२०२३ च्या बीबीएलमध्ये नेसरचा झेल घेण्यापूर्वी, मॅट रेनशॉने २०२० च्या हंगामात गॅब्बा येथे झालेल्या सामन्यात मॅथ्यू वेडला बाद करून असाच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. सीमा ओलांडल्यानंतर, रेनशॉने चेंडू परत मैदानात टॉम बँटनकडे फेकला, ज्याने झेल पूर्ण केला. या वर्षाच्या सुरुवातीला, एमसीसीने आयसीसीला एक चिठ्ठी पाठवली होती, ज्यामध्ये नेसरचा झेल ‘बनी हॉप्ड’ असल्याचे वर्णन केले होते आणि काही प्रयत्न अन्याय्य असल्याने नियमात बदल करण्याची मागणीही केली होती.
एमसीसीने असेही म्हटले आहे की, “एमसीसीने एक नवीन शब्द तयार केला आहे जो ‘बनी हॉप’ हा शब्द सीमारेषेबाहेर पूर्णपणे काढून टाकतो, परंतु ज्या झेलमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू सीमारेषेवरून ढकलतो, बाहेर पडतो आणि नंतर चेंडू पकडण्यासाठी परत डायव्ह करतो अशा झेलांना अजूनही परवानगी आहे.”