फोटो सौजन्य : MI New York
Major League Cricket 2025 : एमआय न्यू यॉर्क विरुद्ध टेक्सास सुपर किंग्ज यांच्यामध्ये मेजर लीग क्रिकेट २०२५ चा दुसरा सामना आज पार पडला. या सामन्यात एमआय न्यू यॉर्कच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. एमआय न्यू यॉर्क यांचा हा पहिलाच सामना होता. एमआय न्यू यॉर्कचे कर्णधार पद हे निकोलस पूरन यांच्याकडे आहे. परंतु तो कर्णधार होताच पूरनचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. आयपीएल 2025 मध्ये निकालस पुरण हा लखनऊ सुपर जॉईंट्स सोबत खेळत होता त्याने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये धुमाकुळ घातला होता. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
एमआय न्यू यॉर्क विरुद्ध टेक्सास सुपर किंग्ज या सामन्यात एमआय न्यू यॉर्ककडून फलंदाजी करताना निकोलस पूरन फक्त ६ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. टेक्सास सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज नूर अहमदने या सामन्यात पूरनला आपला बळी बनवले. यापूर्वी, नूर अहमदने आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून अद्भुत गोलंदाजी सादर केली होती.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टेक्सास सुपर किंग्जने २० षटकांत ६ गडी गमावून १८५ धावा केल्या. टेक्सासकडून फलंदाजी करताना ड्वेन कॉनवेने ४४ चेंडूत ६५ धावा केल्या. ज्यामध्ये २ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. याशिवाय, ७ व्या क्रमांकावर आलेल्या केल्विन सॅव्हेजने शानदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले, त्याने ३४ चेंडूत ५३ धावा केल्या. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून ४ षटकार आणि २ चौकार निघाले. एमआय न्यू यॉर्ककडून गोलंदाजी करताना मायकेल ब्रेसवेलने सर्वाधिक २ बळी घेतले.
An absolute nail-biter ‼️ @TexasSuperKings claim victory over MI New York by three runs. 👏 pic.twitter.com/DFqBIC6ji0
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) June 14, 2025
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या एमआय न्यू यॉर्क संघाला २० षटकांत ८ गडी गमावून फक्त १८२ धावा करता आल्या. एमआयकडून मोनक पटेलने सर्वाधिक ६२ धावा केल्या. याशिवाय मायकेल ब्रेसवेलने ३८ आणि किरॉन पोलार्डने ३२ धावा केल्या. टेक्सास सुपर किंग्जकडून गोलंदाजी करताना अॅडम मिल्नेने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मेजर लीगचा तिसरा सामना हा सॅन फ्रॅन्सिको युनिकाॅर्न्स विरुद्ध एलए नाइट राइडर्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे.