LSG vs RCB: 'This is not the captain's job..', R Ashwin's anger over Rishabh Pant's 'that' decision! Digvesh Rathi's support..
LSG vs RCB : २७ मे रोजी लीग स्टेजचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला होता. जिथे जितेश शर्माने एक शानदार खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला होता. पण, या सामन्यात चर्चा झाली ती म्हणजे दिग्वेश राठीने नॉन-स्ट्रायकरवर जितेशला बाद करणे हा होता, ज्यावर माजी फिरकीपटू आर अश्विनने ऋषभ पंतला फटकारले आहे.
आरसीबीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात लखनौने चांगली कामगिरी करत २२७ धावा उभारल्या होत्या. परंतु जेव्हा या लक्ष्याचा बचाव करण्याची वेळ आली तेव्हा मात्र लखनौच्या गोलंदाजांची कामगिरी सुमार दर्जाची झालेली दिसून आली. सामना एकतर्फी जिंकणारी खेळी करणाऱ्या जितेश शर्माला बाद करण्यासाठी दिग्वेश राठीने जमतील ते प्रयत्न केले. त्यात तो यशस्वी देखील झाला होता, परंतु, अनेकांना ऋषभ पंतच्या उदरतेने घोळ झाला. तेची उदारता काहींना आवडली नाही. ज्यामध्ये आर अश्विनचाही देखील समावेश आहे.
खरंतर, गेल्या सामन्यात दिग्वेश राठीकडून जितेश शर्माला मांकडिंगच्या मदतीने बाद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अपील करण्यात आले, त्यानंतर निर्णय तिसऱ्या पंचाकडे गेला. तथापि, तो बाद झाला नाही, परंतु यादरम्यान लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने ते अपील मागे घेतली. यावर अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली. पंतच्या निर्णयावर टीका केली आहे. अश्विनने यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले आहे की, ‘जर जितेश शर्मा गोलंदाजीच्या हालचालीत येण्यापूर्वी क्रिजच्या बाहेर असता तर त्याला बाद देण्यात आले असते. जेव्हा गोलंदाजाने अपील केले तेव्हा अंपायरकडून विचारण्यात आले, त्याला अपील करायचे आहे का आणि त्याने हो म्हटले, तेव्हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे पोहचला. जेव्हा दिग्वेश फ्रंटफूटवर उतरला तेव्हा जितेश क्रीजवर होता. म्हणून त्याला बाद देता आले नाही. इथपर्यंत सर्व काही ठीक दिसत होते.
आश्विन पुढे म्हणाला, ‘पण यानंतर एक कथा तयार झाली, समालोचक म्हणत आहेत की, जितेश शर्माने ऋषभ पंतला मिठी मारली, अपील मागे घेऊन पंतने किती चांगला निर्णय घेतला असे बोलण्यात आले आहे. आपल्या गोलंदाजाला सर्वांसमोर लहान वाटू देणे, कर्णधाराचे काम नाही. त्याने हे अपील मागे घेण्यापूर्वीच निर्णय घ्यायला पाहिजे होता.’
अश्विननेही त्याचा एक किस्सा शेयर केला. तो म्हणाला की, ‘माझ्या आणि जोस बटलरसोबत घडलेल्या घटनेप्रमाणे, पुढच्या वर्षी मी दिल्ली कॅपिटल्सच्या संघात गेलो. रिकी पॉन्टिंगने मला येऊन सांगितले की आम्हाला आमच्या संघामध्ये नॉन-स्ट्रायकरला अशा प्रकारे धावबाद करू नये असा विचार आहे आणि तुम्हीही ते पाळायला हवे. म्हणून मी म्हणालो ठीक आहे. जर हा तुमचा नियम असेल तर मी ते करणार नाही. ‘
हेही वाचा : PBKS vs RCB : आज अय्यरसेना आणि पाटीदारसेनेते महामुकाबला! अशी असेल, दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-११
अश्विन पुढे म्हणाला की, “तुमच्या गोलंदाजाला लहान का वाटू द्यावे? अशा प्रकाराने गोलंदाजाला खूप लहान वाटेल. तो पुन्हा असे कधीही करणार नाही आणि लोक असे देखील म्हणणार की, करू नये. हे का करू नये? यामुळे गोलंदाजाच्या मनात कायमची भीती बसून जाईल. पण गोलंदाजाची कोणी देखील पर्वा करत नाही, म्हणून त्याचे अपील मागे घेण्यात येऊ शकते.” असे आश्विन म्हणाला.