दुबई : रविवारी आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना पारपडला. श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगलेला रोमांचक सामना पाहण्यासाठी श्रीलंका आणि पाकिस्तानचे चाहतेच नव्हे तर भारतासह इतर देशांचे क्रिकेट चाहते देखील उपस्थित होते. मात्र यावेळी भारतीय संघाच्या अनेक चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करून दिला नाही असा आरोप काही चाहत्यांनी केला आहे.
भारत आर्मी या प्रसिद्ध फॅन क्लबच्या सदस्याने दावा केला आहे की, त्याला आणि इतर दोन चाहत्यांना भारतीय जर्सी घालून स्टेडियममध्ये प्रवेश करून दिला नाही. भारत आर्मीने ट्विटरवर लिहिले की, भारतीय चाहत्यांनी टीम इंडियाची जर्सी घालून स्टेडियममध्ये प्रवेश करू शकत नाही. हे अत्यंत धक्कादायक वागणूक आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. तरीही टीम इंडियाच्या अनेक चाहते सामना पाहण्यासाठी आले होते. मात्र त्यांना गेटवरच थांबवण्यात आले. भारत आर्मी या प्रसिद्ध फॅन क्लबच्या सदस्याने दावा केला आहे की, त्याला आणि इतर दोन चाहत्यांना भारतीय जर्सी घालून स्टेडियममध्ये प्रवेश करून दिला नाही. भारत आर्मीने ट्विटरवर लिहिले की, भारतीय चाहत्यांनी टीम इंडियाची जर्सी घालून स्टेडियममध्ये प्रवेश करू शकत नाही. हे अत्यंत धक्कादायक वागणूक आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारत आर्मी ने पुढे लिहिले की, आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषद आम्ही तुम्हाला चौकशीची विनंती करत आहे. कारण अनेक चाहते आशिया कप पाहण्यासाठी भारतातून प्रवास करूण येतात. त्यांना स्थानिक अधिकारी आणि पोलिसांनी सांगितले की ते स्टेडियममध्ये जाऊ शकत नाहीत! हे अत्यंत धक्कादायक वर्तन आहे.
? SHOCKING TREATMENT as The Bharat Army and other Indian Cricket Fans told they can not enter the stadium wearing ‘India jerseys’! #BharatArmy #PAKvSL pic.twitter.com/5zORYZBcOy
— The Bharat Army (@thebharatarmy) September 11, 2022