Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! एकाच दिवशी टीम इंडियाचे तब्बल ३ मोठे सामने; वेळापत्रक लगेच नोट करून ठेवा

१७ जून रोजी भारताचे तीन वेगवेगळे संघ एकाच दिवशी मैदानात उतरणार आहेत. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चाहत्यांना क्रिकेटचा नॉन-स्टॉप ओव्हरडोज मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही सामन्याचा थरार चुकू नये म्हणून या सर्व सामन्यांची अचूक वेळ आणि शेड्युल आधीच नोंदवून ठेवा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 16, 2026 | 05:59 PM
क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! एकाच दिवशी टीम इंडियाचे तब्बल ३ मोठे सामने (Photo Credit - X)

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! एकाच दिवशी टीम इंडियाचे तब्बल ३ मोठे सामने (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी!
  • एकाच दिवशी टीम इंडियाचे तब्बल ३ मोठे सामने
  • वेळापत्रक लगेच नोट करून ठेवा
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी बुधवार, १७ जून हा दिवस अत्यंत रोमांचक आणि ऐतिहासिक ठरणार आहे. सध्या टीम इंडियाचे वेगवेगळे संघ जगातील विविध मैदानांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. एका बाजूला अफगाणिस्तानचा वरिष्ठ संघ भारत दौऱ्यावर आहे, तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंचा समावेश असलेला भारत ‘अ’ संघ श्रीलंका दौऱ्यावर तिरंगी मालिका खेळत आहे. याचदरम्यान इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा थरार रंगला आहे. विशेष म्हणजे, या तीनही स्पर्धांमध्ये बुधवार, १७ जून रोजी भारताचे तीन वेगवेगळे संघ एकाच दिवशी मैदानात उतरणार आहेत. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चाहत्यांना क्रिकेटचा नॉन-स्टॉप ओव्हरडोज मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही सामन्याचा थरार चुकू नये म्हणून या सर्व सामन्यांची अचूक वेळ आणि शेड्युल आधीच नोंदवून ठेवा.

१. भारत ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’ (तिरंगी मालिका) – सकाळी १०:०० वाजता

बुधवारच्या या महाशेड्यूलची सुरुवात युवा खेळाडूंच्या सामन्याने होईल. युवा फलंदाज तिलक वर्माच्या (Tilak Varma) नेतृत्वाखाली भारत ‘अ’ संघ सध्या श्रीलंकेत तिरंगी ५० षटकांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील भारताचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा लीग सामना अफगाणिस्तान ‘अ’ संघाविरुद्ध खेळवला जाणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असेल. भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने भारताला धूळ चारली. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ५० षटकांत टाय झाला आणि सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. आता अंतिम फेरीत (Final) धडक मारण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. हा वनडे सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत संपण्याची शक्यता आहे.

२. भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दुसरा वनडे सामना) – दुपारी १:३० वाजता

दिवसातील दुसरा मोठा सामना भारत आणि अफगाणिस्तानच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघांमध्ये खेळवला जाईल. दोन्ही देशांमध्ये सध्या ३ एकदिवसीय (ODI) सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी विजय नोंदवला होता. आता कर्णधार शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली भारतीय वरिष्ठ संघ दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. हा हाय-व्होल्टेज ५० षटकांचा सामना दुपारी १:३० वाजता सुरू होईल आणि रात्री ८:३० वाजेपर्यंत चालेल.

India A संघात ‘या’ अफलातून खेळाडूची एन्ट्री; बीसीसीआयने केली मोठी घोषणा, कारण काय?

३. आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप: भारत विरुद्ध नेदरलँड्स – संध्याकाळी ७:०० वाजता

संध्याकाळच्या सत्रात क्रिकेटप्रेमींचे लक्ष थेट इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाकडे असेल. पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर, आत्मविश्वासाने रसरसलेला हरमनप्रीत कौरचा भारतीय महिला संघ आपल्या दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात भारताचा सामना नेदरलँड्सविरुद्ध (India vs Netherlands) होणार आहे. हा टी-२० सामना असल्याने तो संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल आणि रात्री १०:३० वाजेपर्यंत संपेल.

संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत दुहेरी थरार!

या ऐतिहासिक वेळापत्रकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी ७:०० ते रात्री ८:०० वाजे दरम्यान क्रिकेट चाहत्यांची मोठी चांदी होणार आहे. या एका तासाच्या कालावधीत शुभमन गिलचा पुरुष संघ अफगाणिस्तानविरुद्ध वनडे सामन्याच्या अंतिम टप्प्यात खेळत असेल, तर दुसरीकडे हरमनप्रीत कौरची महिला ब्रिगेड वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध पहिल्या षटकाचा सामना करत असेल. एकाच वेळी दोन भारतीय संघ वेगवेगळ्या देशांत मैदानात बाजी मारताना पाहणे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल.

IND vs AFG 2nd ODI Pitch Report: लखनौची खेळपट्टी कोणाला साथ देणार? भारताकडे मालिका जिंकण्याची संधी

Web Title: Three major team india matches on a single day make a note of the schedule right away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • IND vs AFG
  • Team India

संबंधित बातम्या

The Making of a Cricketer: लोकांनी चेहऱ्यावरून ‘पुरुष’ हिणवलं पण…; वाचा ‘टीम इंडिया’च्या Bharti Fulmali ची कहाणी
1

The Making of a Cricketer: लोकांनी चेहऱ्यावरून ‘पुरुष’ हिणवलं पण…; वाचा ‘टीम इंडिया’च्या Bharti Fulmali ची कहाणी

The Making of a Cricketer: गल्ली क्रिकेट ते थेट वर्ल्ड कप! Nandini Sharma ने घडवला इतिहास, वाचा संघर्षाची कहाणी
2

The Making of a Cricketer: गल्ली क्रिकेट ते थेट वर्ल्ड कप! Nandini Sharma ने घडवला इतिहास, वाचा संघर्षाची कहाणी

Ind W vs Pak W Fight Video: आधी गळा पकडला मग धक्का दिला;  IND vs PAK सामन्यात हाणामारी? मैदानातील Video व्हायरल
3

Ind W vs Pak W Fight Video: आधी गळा पकडला मग धक्का दिला; IND vs PAK सामन्यात हाणामारी? मैदानातील Video व्हायरल

IND vs AFG 2nd ODI Pitch Report: लखनौची खेळपट्टी कोणाला साथ देणार? भारताकडे मालिका जिंकण्याची संधी
4

IND vs AFG 2nd ODI Pitch Report: लखनौची खेळपट्टी कोणाला साथ देणार? भारताकडे मालिका जिंकण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.