भारत विरुद्ध अफगणिस्तान दूसरा सामना (फोटो- ians)
१७ जून रोजी होणार भारत विरुद्ध अफगणिस्तान सामना
लखनौच्या एकाना स्टेडियमवर येणार आमनेसामने
भारताला मालिका खिशात घालण्याची संधी
India Vs Afghanistan 2 Odi Match: भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना नुकताच धर्मशाळा येथे पार पडला. १३ जून रोजी झालेल्या सामन्यात भारताने अफगणिस्तानचा पराभव केला आहे. भारत या मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे. दरम्यान दूसरा सामना कुठे आणि किती (Cricket News) वाजता सुरू होणार आहे जाणून घेऊयात.
भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्या मालिकेतील दूसरा एकदिवसीय सामना १७ जून रोजी पार पडणार आहे. लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दीर्घ कालावधीनंतर या स्टेडियमवर एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे येथील खेळपट्टी दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे.
भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यातील दूसरा सामना लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे. मागील सामन्यात पावसामुळे सामना प्रत्येकी २५ ओव्हर्सचा खेळवण्यात आला होता. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने भारत विरुद्ध अफगणिस्तान पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला आहे.
IND Vs AFG Live: टीम इंडियात ‘या’ दोन नव्या चेहऱ्यांची एन्ट्री; अफगणिस्तानविरुद्ध करणार पदार्पण
पहिल्या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुलने आपल्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. दोन्ही फलंदाजांनी खास आक्रमक शैलीत खेळी करत भारताला या मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला आहे. आता १७ जून रोजी दूसरा सामना खेळवला जाणार आहे.
पीच रिपोर्ट?
लखनौच्या एकाना स्टेडियमवर असणारी खेळपट्टी स्पिनर्सला अनुकूल असल्याचे म्हटले जाते. येथील पीच काळ्या मातीपासून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी चेंडूला टर्न मोठ्या प्रमाणावर मिळतो. मात्र फलंदाजांनी काही ओव्हर्स खेळून काढल्या तर ते चांगली फलंदाजी करू शकतात. येथील पीच काही प्रमाणात स्लो आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ या ठिकाई गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
IND vs AFG ODI Live: धर्मशाळेत पावसाने घातला खोळंबा, टॉसला विलंब; सामना रद्द होणार?
भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वाशिंग्टन सुंदर, हर्ष दुबे, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार / प्रिन्स यादव.
अफगणिस्तान संघ: रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अझमतुल्लाह ओमरझाई, इक्राम अलीखिल (यष्टीरक्षक), रशीद खान, मोहम्मद सलीम, गझनफर , झियाउर रहमान






