अशोक शर्माची भारतीय संघात एन्ट्री (फोटो- सोशल मीडिया)
दुखापतीमुळे युद्धवीर सिंह संघाबाहेर
अशोक वर्माला बीसीसीआयने दिली मोठी संधी
तिलक वर्माच्या नेतृत्वात भारताची निराशाजनक कामगिरी
IND Vs AFG Vs SL Live: सध्या श्रीलंकेत ट्राय सिरिज सुरू आहे. भारत, श्रीलंका आणि अफगणिस्तान यांच्यात सिरिज सुरू आहे. भारत अ संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करत आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दरम्यान भारतीय संघात एका नव्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने याची घोषणा केली आहे.
ट्राय सिरिजमध्ये भारत अ संघ तीन सामने खेळला आहे. त्यापैकी केवळ १ च सामना भारताला जिंकता आला आहे. त्यामुळे तिलक वर्माच्या नेतृत्वात भारतीय सांघी उर्वरित सामन्यांमध्ये कशी कामगिरी करणार हे पहावे लागणार आहे. त्यांचा पुढील सामना अफगणिस्तानविरुद्ध होणार आहे. दरम्यान त्या आधी अशोक वर्माची भारतीय संघात वर्णी लागली आहे.
भारतीय संघात बीसीसीआयने अहसओक वर्माची घोषणा केली आहे. युद्धवीर सिंह हा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. शारीरिक दुखापतीमुळे युद्धवीर सिंह खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागी अशोक वर्माला स्थान देण्यात आले आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
फॉर्म गेला आता कारवाईची भीती! ‘त्या’ कृतीमुळे Vaibhav Sooryavanshi अडचणीत? आयसीसीचा नियम काय?
Vaibhav Sooryavanshi अडचणीत?
काल ट्राय सिरिजमध्ये भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने भारताचा पराभव केला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुपर ओव्हरचा सामना झाला. या सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव झाला. मात्र त्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू आणि वैभव सूर्यवंशीमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. वैभव सूर्यवंशीने खेळाडूला धक्काबुक्की दिल्याचे पाहायला मिळाले. आता त्यावर आयसीसी कारवाई करण्याची शक्यता आहे. आयसीसीचा नियम काय सांगतो ते जाणून घेऊयात.
IND A vs SL A: चर्चा तिलक वर्माच्या ‘त्या’ कृतीची; सुपर ओव्हरआधी अंपायरसोबत थेट…, Video Viral
आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्ट २.१२ नुसार कोणत्याही खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अंपायर यांच्याशी चुकीच्या प्रकारे शारीरिक संपर्क करणे नियमंच भंग समजला जातो. नियमानुसार क्रिकेटमध्ये अनुचित शारीरिक संपर्क करणे प्रतिबंधित आहे. आस केल्यास त्या खेळाडूला किंवा त्या व्यक्तीला दोषी समजले जाऊ शकते. अशावेळी आयसीसी त्याला इशारा किंवा त्याचे पॉईंट्स कमी करणे अथवा दंड लावणे अशी कारवाई करू शकते.






