केपटाऊन : आज क्रिकेटच्या (Cricket) मैदानावर द्वंद पाहयाल मिळणार आहे. पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान (India Pakistan) यांच्यात आज महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या (Women t-20 world cup) सामना होत आहे. या स्पर्धेतील हायव्होल्टेज आणि बहुप्रतिक्षित सामना हा आज (रविवारी 12 फेब्रुवारीला) होणार आहे. हा सामना सामन्याला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्याच्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताची उपकर्णधार स्मृती मानधना या सामन्यात खेळणार नसल्याचे आता समोर येत आहे. हाताला झालेल्या दुखापतीमुळे स्मृती मानधनाला संघाबाहेर जावे लागले आहे. (India Match Against Pakistan In Womens World Cup Vice-Captain Smriti Mandhana Ruled Out With Minor Finger Injury)
भारतीय संघाला धक्का…
या सामन्याच्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या महत्वाच्या सामन्याआधी टीम इंडियाला एक जबर धक्का बसला. सलामीची फलंदाज स्मृती मंधाना अंगठ्याच्या दुखापतीमुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाली. टीम इंडियाचे कोच ऋषिकेश कानिटकर यांनी याबाबतची माहिती दिली. स्मृती विंडिज विरुद्धच्या 15 फेब्रुवारीच्या सामन्याआधी फिट होईल, असंही कानिटकर यांनी सांगितलं. पण आजच्या सामन्यात स्मृती खेळणार नाही, असं संघ व्यवस्थापनाने म्हटलंय.
इतिहास काय सांगतो?
भारत व पाक यांच्यातील आतापर्यंत इतिहास पाहता, भारत-पाक यांच्यात 13 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 13 पैकी 10 सामन्यात विजय मिळवला. तर फक्त 3 वेळा पाकिस्तानता विजय झालाय. तर टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ एकूण 6 वेळा भिडले आहेत.इथेही भारताचा वरचष्मा राहिला आहे. भारताने 4 वेळा पाकिस्तानता धुव्वा उडवलाय. तर पाकिस्तानला 2 सामन्यात जिंकता आलं आहे. तर वनडे कपमधील चारही सामन्यात टीम इंडियानेच पाकिस्तानवर मात केलीय.
सामना कोण जिंकणार?
वर्ल्ड कपपेक्षा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आणि तितकाच प्रतिष्ठेचा असतो. महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झालीय. भारत-पाक यांचा 12 तारखेला वर्ल्ड कप मोहिमेतील पहिलाच सामना आहे. दोघेही कट्टर प्रतिस्पर्धी. त्यामुळे दोन्ही संघांकडून हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न असणार आहे. मात्र कोणती टीम जिंकणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.