फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Tom Banton hits triple century : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा नवा हंगाम सुरु झाला आहे, या सीझनमध्ये अनेक मनोरंजक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळाले. त्याचबरोबर आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावामध्ये खेळाडूंवर पैशांची उधळपट्टी करण्यात आली. एवढेच नव्हे तर रिषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. इंग्लंडचा २६ वर्षीय फलंदाज टॉम बँटनने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात भाग घेतला होता. त्याने त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली होती, परंतु कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नाही.
सध्या आयपीएल २०२५ सुरू आहे आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाचाही एकही सामना नाही. अशा परिस्थितीत टॉम बँटनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तो इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सोमरसेट संघाकडून खेळत आहे आणि खूप चांगली कामगिरी करत आहे. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सॉमरसेटकडून खेळताना टॉम बँटनने वॉर्सेस्टरशायरविरुद्ध शानदार फलंदाजी केली आहे. त्याने त्रिशतक (३०० पेक्षा जास्त धावा) केले आहे. आतापर्यंत त्याने ३८३ चेंडूत ३४४ धावा केल्या आहेत. या डावात त्याने ५४ चौकार आणि १ षटकार मारला आहे. वॉस्टरशायरचे गोलंदाज त्याच्यासमोर अजिबात टिकू शकले नाहीत आणि पूर्णपणे अपयशी ठरले.
Tom Banton surpassed some legendary names with his record-breaking 344* for Somerset 🙌 pic.twitter.com/rxoZzDGhDB — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 5, 2025
टॉम बँटन आता सॉमरसेटसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे. त्याने जस्टिन लँगरचा १९ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. २००६ मध्ये, लँगरने सॉमरसेटकडून सरेविरुद्ध ३४२ धावा केल्या. पण आता टॉम बँटनने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जस्टिन लँगर सध्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा प्रशिक्षक आहे.
सॉमरसेटने आतापर्यंत सामन्यात ६३७ धावा केल्या आहेत आणि अजूनही ४ विकेट शिल्लक आहेत. त्याआधी, वॉर्सेस्टरशायरने प्रथम फलंदाजी करताना फक्त १५४ धावा केल्या. यानंतर, सॉमरसेटकडून टॉम बँटन आणि जेम्स र्यू यांनी शानदार फलंदाजी केली. बँटनने त्रिशतक ठोकले, तर जेम्सने १५२ धावा केल्या. टॉम बँटन इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडूनही खेळला आहे. त्याने ७ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण १७२ धावा आणि १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३२७ धावा केल्या आहेत.
इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक दिसणार नव्या भूमिकेत! पाकिस्तानमध्ये मिळाली नवी ‘नोकरी
आयपीएल २०२५ मधून अशा अनेक खेळाडूंना वगळण्यात आले आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली होती. यामधील सर्वात मोठी उदाहरण म्हणजेच शार्दूल ठाकूर. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये शार्दूल ठाकूरला कोणीही विकेट घेतले नाही पण त्याला लाखनौ सुपर जायंट्सच्या संघाने रिलेसमेंट म्हणून संघासाठी स्थान मिळाले आणि त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.