Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS ENG : ‘दो भाई, दोनो तबाही’, इंग्लंडविरुद्ध कहर करणाऱ्या सिराज-दीपची पोस्ट व्हायरल..

तरुण कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एजबॅस्टन येथे इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभूत करून इतिहास लिहिला आहे. या विजयात मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांचा मोठा वाटा आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 07, 2025 | 08:00 PM
IND VS ENG: 'Two brothers, two destruction', Siraj-Deep's post causing havoc against England goes viral..

IND VS ENG: 'Two brothers, two destruction', Siraj-Deep's post causing havoc against England goes viral..

Follow Us
Close
Follow Us:

IND VS ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना आठवणीत राहील असा झाला आहे. या सामन्यात तरुण कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एजबॅस्टन येथे इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभूत करून इतिहास लिहिला आहे. टीम इंडियाने बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे पहिल्यांदाच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. परदेशात कसोटी स्वरूपातील हा भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या सामन्यात शुभमन गिलसह गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाने यजमान इंग्लंडचा ३३६ धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाच्या या विजयात मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांचा मोठा वाटा आहे. यामध्ये सिराजने दोन डावात ७ विकेट्स आणि आकाश दीपने दोन्ही डावात मिळून १० बळी घेतले. यानंतर सोशल मीडियावर ‘दो भाई, दोनो तबाही’ नावाची पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे.

हेही वाचा : Zim vs SA : क्रिकेट विश्वात तहलका! दक्षिण आफ्रिकेच्या Wian Mulder चे विश्वविक्रमी त्रिशतक

‘दोनो भाई, दोनो तबाही’ नावाची पोस्ट व्हायरल

भारताच्या विजयानंतर आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सकडून सोशल मीडियावर एक मजेदार पोस्ट शेअर करण्यात आली आहे.  त्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आकाश दीप आणि मोहम्मद सिराजचा फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, ‘दो भाई, दोनो तबाही’. एक प्रकारे या दोन्ही गोलंदाजांनी एजबॅस्टनमध्ये इंग्लंड संघात कहर माजवला आहे.  त्यामुळे हा शब्द दोघांनाही शोभतोया आहे.

दोघांनी मिळून घेतल्या १७ विकेट्स

आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या भारतीय गोलंदाजांनी  गोलंदाजीत एकमेकांना उत्तम साथ देऊन भागीदारी केली. या दोघांनी दोन्ही डावात इंग्लंडच्या १७ फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. पहिल्या डावात इंग्लंडचे फलंदाज मोहम्मद सिराजसमोर पाणी मागताना दिसून आले. सिराजने पहिल्या डावात इंग्लंडच्या ६ फलंदाजांना आपली शिकार बनवले. त्याच वेळी, दुसऱ्या डावात त्याने १ विकेट घेतली. एजबॅस्टन कसोटीत सिराजने एकूण ७ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : अखेर Prithvi Shaw चा मुंबईला रामराम! ऋतुराज गायकवाडसोबत ‘या’ संघाकडून खेळणार

त्याच वेळी, बुमराहच्या जागी संघात सामील स्थान देण्यात आलेल्या आकाश दीप एजबॅस्टन येथे इंग्लंड संघासाठी एक वाईट स्वप्न  ठरला. त्याने या कसोटी सामन्यात एकूण १० बळी टिपले. आकाश दीपने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ बळी घेतले आहेत. त्यामुळे इंग्लंड संघ धावसंख्येच्या जवळ देखील जाऊ शकला नाही.

Web Title: Two brothers two destruction siraj deeps post causing havoc against england goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • Akash Deep
  • IND Vs ENG
  • Mohammad Siraj

संबंधित बातम्या

IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज
1

IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार
2

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर
3

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ
4

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.