वियान मुल्डर(फोटो-सोशल मीडिया)
South Africa’s Wian Mulder sets world record as captain : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दूसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा ३३६ धावांनी विजय मिळवत इतिहास घडवला आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या वियान मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्वविक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेची धुरा सांभाळणाऱ्या वियान मुल्डरने सोमवारी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पण करून इतिहास रचला आहे. कर्णधार म्हणून पदार्पण करताना पहिल्या डावात त्रिशतक झळकवणारा मुल्डर हा कसोटी इतिहासातील पहिला खेळाडू बनला आहे.
पहिल्या डावात मुल्डरने नाबाद २६४ धावा काढल्यानंतर त्याने ती धावसंख्या तीन अंकी आकड्यांपर्यंत नेली. त्याने २९७ चेंडूत आपले पहिले त्रिशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात जलद त्रिशतक ठरले आहे. याआधी भारताचा वीरेंद्र सेहवागने जलद त्रिशतक पूर्ण केले होते. त्याने २००८ मध्ये चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २७८ चेंडूत ३०० धावा फटाकवल्या होत्या.
मुल्डरने न्यूझीलंडच्या ग्रॅहम डोलिंगचा विक्रम मोडीत काढला आहे. ज्याने १९६९ मध्ये भारताविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पणात २३९ धावा काढल्या होत्या. त्याने २००३ मध्ये इंग्लंडविरुद्ध २७७ धावा करणाऱ्या ग्रॅमी स्मिथचा विक्रम मोडीत काढला होता. आता मुल्डर दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यासोबतच, त्याने गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध ३१० चेंडूत त्रिशतक झळकावणाऱ्या हॅरी ब्रूकचा देखील विक्रम मोडला आहे.
हा मुल्डर त्याचा २१ वा कसोटी सामना खेळत आहे. तो दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा हाशिम अमला नंतरचा दुसरा खेळाडू बनला आहे. मुल्डरची ही खेळी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी ऐतिहासिक बनली आहे.
हेही वाचा : MS Dhoni हा सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा भारतीय कर्णधार! रोहित शर्मा मागे? जाणून घ्या यादी