PBKS vs CSK: 'These' Chennai players are facing expulsion from the team, they were declared villains in the last match,
PBKS vs CSK : आज आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई संघाचा सामना पंजाब किंग्ससोबत होणार आहे. आयपीएलच्या१८ व्या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदा समोरासमोर येणार आहे. या हंगामात चेन्नई संघाची कामगिरी आतापर्यंत खूपच निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत चेन्नई संघाने एकूण ४ सामने खेळले असून त्यांना केवळ एकच सामना जिंकता आला आहे तर तीन सामने गमवावे लागले आहे. गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली संघाने २५ धावांनी पराभूत केले होते. या परभवासह सीएसकेला या हंगामात सलग तीन पराभव बघावे लागले. यानंतर, आज चेन्नईचा सामना पंजाब किंग्जसोबत होणार आहे. चेन्नईला हा सामना जिंकावाच लागणार आहे. जर चेन्नईने पंजाबला हरवले नाही तर त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर देखील पडावे लागू शकते.
चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल २०२५ मधील पाचवा सामना मुल्लापूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध खेळवाला जाणार आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेन्नई सुपर किंग्जचा संघ या सामन्यात त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : MI vs RCB : कोहलीचा स्वॅगच निराळा! धोकादायक बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर लगावला षटकार.., पहा व्हिडिओ
चेन्नईसाठी सलामीवीरांकडून न् होणाऱ्या धावा ही बाब चिंतेची ठरली आहे. अशा परिस्थितीत, डेव्हिन कॉनवे संघात येण्याची शक्यता आहे. त्याच्यासोबत रचिन रवींद्र ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. असे बोलले जात आहे. याशिवाय, चेन्नई सुपर किंग्ज संघ त्यांच्या मधल्या फळीत देखील बदल करण्याच्या शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. अष्टपैलू विजय शंकरच्या जागी शेख रशीदला अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. असे बोलले जात आहे. विजय शंकरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतक झळकावले होते, परंतु त्यासाठी त्याने अनेक चेंडू खर्ची घालावे लागले होते. अशा परिस्थितीत आता चेन्नई त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता व्यक्त केली आजात आहे.
हेही वाचा : PBKS vs CSK :धोनीची बॅट चालणार का? पंजाब किंग्ज विरुद्ध सीएसकेची आज पहिली लढत, जाणून घ्या A टू Z माहिती
तसेच, चेन्नई सुपर किंग्ज गोलंदाजीत कोणतेही बदल करण्याच्या मनस्थितीत नाही. चेन्नईसाठी खलील अहमद, मुकेश चौधरी आणि मतिशा थेक्षाना आतापर्यंत संतुलित गोलंदाजी करताना दिसून येत आहे. फिरकीपटू म्हणून, अश्विन, जडेजा आणि खलील अहमद हे देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग असण्याची शक्यता बोलली जात आहे.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, प्रियांश आर्य, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, नेहल वढेरा, युझवेंद्र चहल, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन.
चेन्नई सुपर किंग्स : रुतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, एमएस धोनी, सॅम कुरान, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, खलील अहमद, मथिशा पाथिराना, मुकेश चौधरी.