फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय क्रिकेट संघाने T२० विश्वचषक जिंकला त्यानंतर भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. आता काही दिवस भारतीय खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यानंतर १९ संप्टेंबर पासून भारताचा संघ बांग्लादेश विरुद्ध मालिका खेळणार आहे. याचदरम्यान भारताचा युवा संघ लवकर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामने खेळणार आहे. नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या वेबसाईटवर U-19 भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे त्याचबरोबर वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. मोहम्मद अमान यांच्याकडे एकदिवसीय सामान्यांचे कर्णधारपद भूषणवण्यात आले आहे तर रुद्रा पटेल हा संघाचा उपकर्णधार असणार आहे.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 विरुद्धच्या चार दिवसांच्या मालिकेसाठी भारताचा अंडर 19 संघाचं कर्णधारपद सोहम पटवर्धन कडे सोपवण्यात आले आहे, तर विहान मल्होत्राकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या मालिकेची सुरुवात २१ सप्टेंबरपासून होणार आहे. यासाठी भारताचा युवा संघाची घोषणा करण्यात आली आहे.
क्रमांक | तारीख | वेळ | व्हेन्यू |
1 | २१ संप्टेंबर २०२४ (शनिवार) | 09:30 | पुद्दुचेरी |
2 | २३ संप्टेंबर २०२४ (सोमवार) | 09:30 | पुद्दुचेरी |
3 | २६ संप्टेंबर २०२४ (गुरुवार) | 09:30 | पुद्दुचेरी |
क्रमांक | तारीख | वेळ | व्हेन्यू |
1 | . ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर | 09:30:00 | चेन्नई |
2 | ७ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर | 09:30:00 | चेन्नई |
रुद्र पटेल (VC) साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमान (C), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (WK), हरवंशसिंग पनगालिया (WK), समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज , रोहित राजावत, मोहम्मद ईनान
वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, विहान मल्होत्रा (व्हीसी), सोहम पटवर्धन (सी), कार्तिकेय के पी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यूके), हरवंशसिंग पनगालिया (डब्ल्यूके), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद इनान