फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये कालपासून सुरू झालेल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने या पहिल्याच सामन्यात मजबूत पकड धरली आहे. पहिला इनिंगमध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खेळ खाल्लास केल्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने शतक ठोकले तर टीम इंडियाच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकीय खेळी खेळल्या. दुसऱ्या दिनाच्या दुसरा सेशन नंतर भारताच्या संघाने चार विकेट्स गमावून आत्तापर्यंत 96 ओवरचा खेळ संपला आहे. भारताच्या संघाने चार विकेट्स कमावून 326 धावा केल्या आहेत.
सध्या क्रिजवर भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि टीम इंडियाचा विकेटकीपर ध्रुव जुरेल हे फलंदाजी करत आहेत. ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी दुसऱ्या सेशनच्या समाप्तीनंतर 108 धावांची पार्टनरशिप केली आहे. यामध्ये 54 धावा केल्या आहेत तर रवींद्र जडेजा यांनी 50 धावा केल्या आहेत. यामध्ये दोघांनीही नऊ चौकार आणि सहा षटकार मारले. हे दोघे अजूनही फलंदाजी करत आहेत.
भारताच्या संघाने साई सुदर्शन सोडता सर्व फलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. दुसऱ्या सेशनमध्ये शुभमन गिल याने अर्धशतक झळकावले. रवींद्र जडेजाने ७५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने त्याच्या ट्रेडमार्क तलवारीने स्विंग करत आनंद साजरा केला. वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.
That’s Tea on Day 2 Impressive fifties from Dhruv Jurel and Ravindra Jadeja take #TeamIndia‘s lead to 164 runs 👏 We will resume with the last session shortly Updates ▶️ https://t.co/MNXdZcelkD#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/aWWVFw9czz — BCCI (@BCCI) October 3, 2025
जेवणाच्या विश्रांतीनंतर भारताची सुरुवात खराब झाली, केएल राहुलने शतक झळकावले. तथापि, त्याच्या बाद झाल्यानंतर, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला. दोघांनी शतकी भागीदारी केली, जुरेलनेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले. केएल राहुलच्या रूपात भारताचा चौथा पराभव झाला. हा भारताचा दिवसातील दुसरा आणि एकूण चौथा बळी होता. याआधी, शुभमन गिल ५० धावांवर बाद झाला. पहिल्या दिवशी भारताच्या दोन विकेट यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शनच्या रूपात आल्या. या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ १६२ धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहने तीन आणि कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या.