
फोटो सौजन्य - JioHotstar
U19 World Cup 2026 – IND vs USA Toss Update : भारत विरुद्ध यूएस यांच्यामध्ये आज विश्वचषकाचा टीम इंडियाचा पहिला सामना सुरू झाला आहे. या विश्वचषकामध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद हे आयुष म्हात्रेकडे असणार आहे. भारताचा पहिला सामना युएसविरुद्ध क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारताच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. मागील काही मालिकांमध्ये भारताच्या युवा संघाने दमदार कामगिरी केली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.
भारत विरुद्ध यूएस पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये भारताकडून वैभव सुर्यवंशी आणि आयुष म्हात्रे हे दोघे संघासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानावर उतरणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाचे उपकर्णधारपद हे विहान मल्होत्राकडे असणार आहे. भारताच्या संघाने आतापर्यत अंडर 19 विश्वचषक सहा वेळा नावावर केला आहे त्यामुळे आता भारतीय संघ सातव्यांदा टायटल नावावर करण्याचा प्रयत्न करेल.
Intresting- No Aaron George in 11 & only 2 front line pacers with Ambrish as seam bowling all rounder #U19WorldCup pic.twitter.com/dFoZfBm0L1 — RevSportz Global (@RevSportzGlobal) January 15, 2026
१९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ चे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर स्ट्रीम केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, हे सामने मोबाइल किंवा लॅपटॉप डिव्हाइसवर JioHotstar द्वारे स्ट्रीम केले जातील. हे लक्षात घ्यावे की भारताचे सर्व गट टप्प्यातील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:०० वाजता सुरू होतील.
आयुष म्हात्रे (कर्णधार), एरॉन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, वैभव सूर्यवंशी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), आरएस अंबरीश, खिलन पटेल, कनिष्क चौहान, मोहम्मद एनान, किशन कुमार सिंह, उद्धव मोहन.
उत्कर्ष श्रीवास्तव (कर्णधार), साहिल गर्ग, अमरिंदर गिल, अर्जुन महेश (विकेटकीपर), नीतीश सुदिनी, ऋषभ शिम्पी, ऋत्विक अप्पिडी, अदित कप्पा, सबरीश प्रसाद, शिव शनि, रयान ताज.