Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Under 19 Asia Cup : भारताला हरवणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर होणार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी! किती मिळणार प्रत्येक खेळाडूला पैसे

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी त्यांच्या देशाच्या १९ वर्षांखालील आशिया कप विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपयांचे विशेष रोख बक्षीस जाहीर केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 23, 2025 | 08:32 AM
फोटो सौजन्य - AsianCricketCouncil सोशल मिडिया

फोटो सौजन्य - AsianCricketCouncil सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

अंडर 19 आशिया कप फायनलचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आणि टीम इंडियाचा फायनलच्या सामन्यामध्ये पराभव झाला. संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती पण भारताचे फलंदाज फायनलच्या सामन्यामध्ये खराब कामगिरी केल्यामुळे आशिया कप 2025 ची ट्राॅफी पाकिस्तानच्या नावावर झाली आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी त्यांच्या देशाच्या १९ वर्षांखालील आशिया कप विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपयांचे विशेष रोख बक्षीस जाहीर केले. रविवारी दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या युवा संघाने भारताला १९१ धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. इस्लामाबाद येथे संघ आणि त्यांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयोजित स्वागत समारंभात शरीफ यांनी ही घोषणा केली.

‘MS धोनीमुळे माझं करिअर उद्ध्वस्त झालं…’, माजी भारतीय क्रिकेटरने केला सत्याचा खुलासा, चाहत्यांनाही धक्का

स्वागत समारंभानंतर संघाचे मार्गदर्शक आणि व्यवस्थापक सरफराज अहमद यांनी माध्यमांना सांगितले की, पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आशिया कप विजेत्या ज्युनियर संघाच्या खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केल्याचे वृत्त आहे.

दुबईमध्ये भारताला हरवून आशिया कप जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाचे मायदेशी परतल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ त्यांच्यासाठी स्वागत समारंभाचे आयोजन करतील. इस्लामाबाद विमानतळावर संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. सहसा वरिष्ठ संघांचे असे स्वागत केले जाते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आधीच या विजयाला देशातील खेळासाठी मोठी कामगिरी असल्याचे घोषित केले होते. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात १७२ धावा करणारा समीर मिन्हास आणि चार विकेट घेणारा वेगवान गोलंदाज अली रझा यांना पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य मानले जात आहे.

Krishnappa Gowtham Retirement: ९ कोटींची बोली अन् धोनीची साथ… भारतीय क्रिकेटमधील मोठ्या अष्टपैलू खेळाडूने घेतला संन्यास!

रविवारी झालेल्या अंडर-१९ वनडे आशिया कपच्या एकतर्फी अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १९१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अशा प्रकारे पाकिस्तानने त्यांचे दुसरे अंडर-१९ आशिया कप विजेतेपद जिंकले. गेल्या काही काळापासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सामन्यानंतर एकमेकांना अभिवादन करणे (हात हलवणे) टाळले. मिन्हासच्या ११३ चेंडूत १७ चौकार आणि नऊ षटकारांच्या मदतीने १७२ धावांच्या जोरावर पाकिस्तानने आठ विकेट गमावून ३४७ धावा केल्या आणि त्यानंतर भारताला २६.२ षटकांत १५६ धावांवर गुंडाळले.

Web Title: Under 19 asia cup crores of rupees will be on pakistani players who beat india how much money will each player get

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • cricket
  • IND VS PAK
  • Sports

संबंधित बातम्या

IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कशी असेल प्लेइंग इलेव्हन? रविचंद्रन अश्विनने सर्व खेळाडूंची केली नावे उघड
1

IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कशी असेल प्लेइंग इलेव्हन? रविचंद्रन अश्विनने सर्व खेळाडूंची केली नावे उघड

T20 World Cup 2026 च्या आधी नेपाळ संघ कॅम्पसाठी तयार, 24 नावे जाहीर!  संघामध्ये आयपीएल क्रिकेटपटूचाही समावेश
2

T20 World Cup 2026 च्या आधी नेपाळ संघ कॅम्पसाठी तयार, 24 नावे जाहीर! संघामध्ये आयपीएल क्रिकेटपटूचाही समावेश

ऑस्ट्रेलियाने आणला ‘Ronball’, इंग्लिश संघाला पराभूत केल्यानंतर हटके अंदाजात साजरा केला आनंद! जाणून घ्या अर्थ
3

ऑस्ट्रेलियाने आणला ‘Ronball’, इंग्लिश संघाला पराभूत केल्यानंतर हटके अंदाजात साजरा केला आनंद! जाणून घ्या अर्थ

अमेरिकी एंथनीचं लज्जास्पद कृत्य… रिंगच्या बाहेर भारतीय बाॅक्सरवर केला हल्ला! नीरज गोयतने त्याला सामन्यात दाखवला दणका, पहा Video
4

अमेरिकी एंथनीचं लज्जास्पद कृत्य… रिंगच्या बाहेर भारतीय बाॅक्सरवर केला हल्ला! नीरज गोयतने त्याला सामन्यात दाखवला दणका, पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.