फोटो सौजन्य - Rajasthan Royals सोशल मीडिया
वैभव सूर्यवंशी : कालचा सामना एका सिनेनाहून कमी नव्हता. गुजरात टायटन्सचा संघ या सीझनमधील एक मजबूत संघ आहे, आणि त्यांनी कालच्या सामन्यात २०९ धावा ठोकल्या होत्या २१० धावांचे लक्ष्य पूर्ण करून राजस्थानच्या संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ऐतिहासिक शतक ठोकल्याबद्दल १४ वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला बक्षीस देण्याचा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे. बिहार सरकारने वैभवला १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री नितीश यांनी राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूच्या असाधारण कामगिरीचे कौतुक केले आणि हा बिहारसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वैभव सूर्यवंशी कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावरील भावनिक संदेशात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लिहिले की, ‘आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेल्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीचे अभिनंदन आणि शुभेच्छा.’ त्याच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेमुळे तो भारतीय क्रिकेटसाठी एक नवीन आशा बनला आहे. सर्वांना त्याचा अभिमान आहे. २०२४ मध्ये मी वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या वडिलांना १ अॅन मार्ग येथे भेटलो आणि त्यावेळी मी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आयपीएलमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर मी त्याच्याशी फोनवर बोललो आणि त्याचे अभिनंदन केले.
आई॰पी॰एल॰ के इतिहास में सबसे कम उम्र (14 साल) में शतक लगाने वाले खिलाड़ी बने बिहार के श्री वैभव सूर्यवंशी को बधाई एवं शुभकामनाएं। वे अपनी मेहनत और प्रतिभा के बलबूते भारतीय क्रिकेट की एक नई उम्मीद बन गए हैं। सभी को उन पर गर्व है। श्री वैभव सूर्यवंशी एवं उनके पिता जी से वर्ष 2024… pic.twitter.com/n3UmiqwTBX
— Nitish Kumar (@NitishKumar) April 29, 2025
बिहार राज्यामधील युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्य सरकारकडून १० लाख रुपयांचे मानधन दिले जाणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. वैभवने भविष्यात भारतीय संघासाठी नवीन विक्रम प्रस्थापित करावेत आणि देशाला गौरव मिळवून द्यावा अशी माझ्या शुभेच्छा आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही या तरुण क्रिकेटपटूचे कौतुक केले आणि त्याच्या कामगिरीला ‘सुंदर सुरुवात’ म्हटले आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याची भविष्यवाणी केली.
बिहारचा रहिवासी असलेल्या सूर्यवंशीने सोमवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर टी-२० शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनून इतिहास रचला. त्याने येथे फक्त ३५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या ३८ चेंडूत १०१ धावांच्या स्फोटक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने युसूफ पठाणचा १५ वर्षांचा विक्रम मोडत ८ विकेटने विजय मिळवला.