IPL 2025: Vaibhav Suryavanshi, who made IPL a success, returned home, received a special welcome.
IPL 2025 : आयपीएलमध्ये आतापर्यंत ६४ सामने खेळवण्यात आले आहेत. आयपीएलचा १८ वा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच राजस्थान रॉयल्स संघाचा स्पर्धेतील प्रवास संपला आहे. या संघातील १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने संपूर्ण हंगाम आपल्या फलंदाजीने गाजवला आहे. त्याची बॅट खूपच तळपलेली दिसून आली. त्याच्या खेळण्याच्या शैलीने त्याने क्रीडा जगताला दखल घ्यायला भाग पाडले. त्याने सर्वात तरुण खेळाडू म्हणून राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. या संधीचे सोने करत त्याने आपली प्रतिभा सिद्ध करून दाखवली. अवघ्या ३५ चेंडूत त्याने १०० धावा केल्या आणि सर्वांना एक सुखद धक्का दिला. अशा प्रकारे आयपीएल २०२५ गाजवून हा खेळाडू आता आपल्या मातृ राज्यात परतला आहे. तिथे त्याच्या घरी वैभवचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होता आहे.
राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीला 1.1 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. तथापि, राजस्थान संघ आयपीएल २०२५ मध्ये आपली छाप पाडू शकला नाही. हा संघ वाईट पद्धतीने प्लेऑफमधून बाहेर पडला. संपूर्ण हंगामात राजस्थानची कामगिरी खराब राहिली आहे. पण या हंगामात राजस्थान संघाला वैभवच्या रूपात एक स्फोटक फलंदाज गसवला आहे. वैभवची त्याच्या पहिल्या आयपीएल करारामुळे खूप चर्चा झाली. पण पदार्पणानंतर त्याने खरा रंग दाखवायला सुरवात केली. राजस्थानच्या वाईट काळात देखील वैभवने आपल्या कामगिरीत सातत्य राखले. पण, आता तो त्याच्या मूळ गावी म्हणजे ताजपूर (बिहार, समस्तीपूर) येथे परतला आहे, जिथे हार घालून आणि केक कापून त्याचे स्वागत करण्यात आले. या वेळी घरात वैभव-वैभव अशा घोषणा देखील देण्यात आल्या. तसेच केकवर “घरात स्वागत आहे बॉस बेबी वैभव.” असे लिहिण्यात आले होते.
वैभव सूर्यवंशीचा राजस्थान रॉयल्स हा संघ स्पर्धेतून जरी बाद झाला असला तरी त्याने आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांतर तो आपल्या घरी परतला आहे. ताजपूरमध्ये वैभवचे एखाद्या हिरोसारखे स्वागत करण्यात आले. संपूर्ण कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांकडून त्याच्या कामगिरीचा आनंद साजरा करण्यात आला.
आयपीएल २०२५ च्या काही सामन्यांनंतर, वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधि मिळाली. त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आयपीएल पदार्पण केले. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावून सर्वांना आश्चर्यचकित केले. या सामन्यात त्याने २० चेंडूत ३४ धावा केल्या होत्या . त्याच्या तिसऱ्या सामन्यात, वैभवने केवळ ३५ चेंडूत शतक झळकावून विक्रम रचला. त्याने ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली होती. या १४ वर्षीय खेळाडूने संपूर्ण हंगामात ७ सामने खेळले आणि ३६ च्या सरासरीने २५२ धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट २०६ होता.