जीटी टीम(फोटो-सोशल मीडिया)
GT vs LSG : आयपीएल २०२५ चा ६४ वा सामना काल गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर हा सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सला लखनऊ सुपर जायंट्सकडून ३३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. लखनौने गुजरातच्या संघासमोर 236 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संघ २०२ धावांपर्यंतच पोहचू शकले. या सामन्यापूर्वी गुजरातच्या खेळाडूंच्या बदलेल्या जर्सीच्या रंगाची चर्चा सुरू झाली होती. या सामन्यात गुजरातचा संघ लव्हेंडर जर्सी घालून मैदानात उतरला होता.
लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात, गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी एका खास हेतूने लैव्हेंडर रंगाची जर्सी घालून मैदानात प्रवेश केला होता. चालू हंगामातील १३ व्या लीग सामन्यात, जीटीने सलग तिसऱ्या हंगामात कर्करोगाविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहिमेला पुढे नेण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे.
अधिकृत वेबसाइटनुसार, गुजरात टायटन्स संघाने यावेळी कर्करोगाच्या रुग्णांची लवकर ओळख आणि काळजी घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझी चाहत्यांना ३०,००० लव्हेंडर झेंडे आणि १०,००० लव्हेंडर जर्सी मोफत वाटण्याची योजना आखत आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ रंग नाही तर त्यातून एक संदेश देण्याताळ आहे; ‘कर्करोग प्रतिबंध, नियमित आरोग्य तपासणी आणि सकारात्मक जीवनशैली’ स्वीकारण्यासाठी लोकांना पावले उचलण्यास प्रेरित करणे.
गुरुवारी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय गुजरात टायटन्सच्या अंगलट आल्याचे दिसले. लखनौ सुपर जायंट्सने मिचेल मार्शच्या(६४ चेंडूत ११७ धावा) शतकाच्या जोरावर २३५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात गुजरात २०२ धावाच करू शकले. यावेळी गिल आणि सुदर्शन जोडी आपली कमाल दाखवू शकली नाही आणि अत्याचा फटका हा संघाला बसला. परिणामी गुजरातला ३३ धावांनी पराभूत व्हावे लागले.
हेही वाचा : SRH vs RCB : आरसीबीची अव्वल स्थानावर नजर! एसआरएचसमोर आज प्लेऑफमधील बंगळुरूचे आव्हान..
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.
लखनौ सुपर जायंट्स: मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओ’रुर्के