गौतम गंभीर(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs END : आयपीएलनंतर टीम इंडिया पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी प्रशिक्षक आणि निवडकर्ते चिंतेत असलेले दिसत आहे. त्यामागील कारण असे की, भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानंतर कसोटी स्वरूपात टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण असेल? असा प्रश्न निर्माण झाले आहे. यावर आता चर्चा सुरू झाली आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी आज म्हणजेच शुक्रवार रोजी (२३ मे) भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण असेल याचे उत्तर देखील मिळणार आहे.
भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज कर्णधार लाभले आहेत. ज्यांनी संघाला उंच स्तरावर पोहचवले आहेत. अशा परिस्थितीत, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार कोण आहे, याबाबत संघाच्या मुख्य प्रशिक्षक असंरया गौतम गंभीरला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने या प्रश्नाचे सहज उत्तर दिले आहे.
एका खास मुलाखती दरम्यान गौतम गंभीरला हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा गंभीरने लगेच माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेचे नाव घेतले. कुंबळेची कर्णधार म्हणून कारकीर्द खूपच छोटी राहिली आहे. पण जोपर्यंत त्याने संघाची धूरा सांभाळत होता. तेव्हा भारतीय संघाची कामगिरी कौतुकास्पद अशीच राहिलीआहे.
२००७ मध्ये जेव्हा राहुल द्रविडने कर्णधारपद सोडले तेव्हा कुंबळेला टीम इंडियाचा पुढचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्या काळात, त्याच्या देखरेखीखाली, भारतीय संघाने एकूण १४ कसोटी सामने खेळले होते. दरम्यान, कुंबळे आणि टीमने तीन सामने आपल्या खिशात घातले होते. तर सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय, टीम इंडिया पाच सामने अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरली होती.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर काल झालेल्या ६४ व्या सामन्यात गुजरात टायटन्सला लखनऊ सुपर जायंट्सकडून ३३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. गुरुवारी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय गुजरात टायटन्सच्या अंगलट आल्याचे दिसले. लखनौ सुपर जायंट्सने मिचेल मार्शच्या(६४ चेंडूत ११७ धावा) शतकाच्या जोरावर २३५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात गुजरात २०२ धावाच करू शकले. यावेळी गिल आणि सुदर्शन जोडी आपली कमाल दाखवू शकली नाही आणि अत्याचा फटका हा संघाला बसला. परिणामी गुजरातला ३३ धावांनी पराभूत व्हावे लागले.