फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीशांत हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. तो त्याच्या भांडणामुळे त्याचबरोबर मैदानामधील खेळाडूंची झालेल्या वादामुळे सातत्याने वादात पाहायला मिळाला आहे. त्याचबरोबर त्यांना मॅच फिक्सिंगच्या प्रकरणांमध्ये देखील बॅन करण्यात आले होते. आता आणखी एक व्हिडिओ चर्चेत आहे आणि तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलमध्ये अनेकदा आपल्याला खेळाडूंमध्ये झालेले वाद पाहायला मिळाले आहेत. पण खेळाडूंमध्ये फार कमी वेळा हाणामारी पर्यंत भांडण झालेली नाहीत.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वादाबद्दल सांगायचे झाले तर हरभजन सिंग आणि श्रीशांत यांच्यातील कानशिलात मारण्याच्या घटने’ अजूनही चर्चेचा विषय आहे. ही घटना आयपीएलच्या पहिल्या हंगामात घडली जेव्हा मोहालीच्या मैदानावर पंजाब किंग्जकडून मुंबई इंडियन्सला दारुण पराभव पत्करावा लागला. २५ एप्रिल २००८ रोजी झालेल्या या सामन्यात हरभजन सिंग मुंबईचा कर्णधार होता. पंजाबने त्यांना ६६ धावांनी पराभूत केले. सामना संपल्यानंतर काही वेळातच कॅमेऱ्यांनी श्रीशांतला रडताना पाहिले. त्यानंतर हरभजन सिंगने श्रीशांतला थप्पड मारल्याचे उघड झाले. पण त्या थप्पडचा व्हिडिओ कोणीही पाहिला नाही.
पण आता या घटनेला १७ वर्षांनंतर, हरभजन सिंगच्या थप्पड मारण्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते खूपच हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की सामना संपल्यानंतर, दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना, हरभजन सिंग श्रीसंतला थप्पड मारतो.
One of the wildest moments in IPL history, Unseen footage of the Bhajji–Sreesanth slapgate that never been aired#IPL pic.twitter.com/E9Ux8bodOW
— Vishal (@Fanpointofviews) August 29, 2025
सुरुवातीचे काही सेकंद श्रीसंतला काय झाले हे समजले नाही, पण नंतर जेव्हा इतर खेळाडू त्याच्या जवळ आले तेव्हा तो रागाने भज्जीकडे जाऊ लागला. त्यानंतर सहकारी खेळाडूंनी मिळून परिस्थिती शांत केली. या थप्पड मारण्याच्या घटनेनंतर, हरभजन सिंगवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली आणि त्याच्यावर ५ एकदिवसीय सामन्यांची बंदी देखील घालण्यात आली. तथापि, हरभजन सिंगला आजपर्यंत याबद्दल पश्चात्ताप आहे.
हरभजन सिंगने मोठ्या व्यासपीठावर अनेकदा आपली चूक कबूल केली आहे, परंतु श्रीशांतच्या मुलीने सांगितलेली एक गोष्ट त्याला अजूनही त्रास देते. ‘मला तुमच्याशी बोलायचे नाही, तुम्ही माझ्या वडिलांना मारले.’ श्रीशांतच्या मुलीने हरभजन सिंगला सांगितलेली ही ओळ आहे. भज्जीचा असा विश्वास आहे की श्रीशांतच्या मुलीच्या नजरेत तो एक वाईट व्यक्ती आहे आणि तो त्याची प्रतिमा सुधारण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तथापि, त्याने असेही म्हटले की जेव्हा श्रीशांतच्या मुलीने त्याला हे सांगितले तेव्हा तो रडू लागला.
भज्जीने अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले होते की, “मला माझ्या आयुष्यात एक गोष्ट बदलायची आहे ती म्हणजे श्रीसंतसोबत घडलेली घटना. मला माझ्या कारकिर्दीतून ती घटना काढून टाकायची आहे. तीच ती घटना आहे जी मी माझ्या यादीतून बदलू इच्छितो. जे घडले ते चुकीचे होते आणि मी जे केले ते मी करायला नको होते. मी २०० वेळा माफी मागितली. मला वाटणारी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्या घटनेनंतरही मी प्रत्येक प्रसंगी किंवा प्लॅटफॉर्मवर माफी मागत आहे.”