फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विराट कोहलीची आकडेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाला यांच्यामध्ये काही तासांमध्ये सामना सुरु होणार आहे. यासाठी भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या ग्राउंडवर घाम गाळत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये अनुपस्थित असणार आहे. परंतु विराट कोहली, जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू संघामध्ये आहेत. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला त्याच्या कामगिरीमुळे चाहते त्याला पसंत करतात. त्याने क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीवर बरीच जबाबदारी असेल. मालिकेत कोहलीची बॅट म्हणजे विजय जवळपास निश्चित आहे.
किंग कोहली सध्या काही काळापासून फ्लॉप वाटत आहे, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. चला तर मग जाणून घेऊया कसा आहे कोहलीचे ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 25 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 44 डावांमध्ये त्याने 47.48 च्या सरासरीने 2042 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 8 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 186 धावा आहे. विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारा पाचवा भारतीय फलंदाज आहे. या यादीत भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत 3630 धावा (74 डावात) केल्या. या यादीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीने आतापर्यंत 44 डावांमध्ये 2042 धावा केल्या आहेत. या यादीत किंग कोहली चेतेश्वर पुजाराच्या खाली आहे. पुजाराने 45 डावात 2074 धावा केल्या आहेत. या मालिकेत कोहली पुजाराचा विक्रम सहज मोडू शकतो.
सचिन तेंडुलकर- 3630 धावा
व्हीव्हीएस लक्ष्मण- 2434 धावा
राहुल द्रविड- 2143 धावा
चेतेश्वर पुजारा- 2074 धावा
विराट कोहली- 2042 धावा.
किंग कोहलीने जून 2011 मध्ये किंग्स्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. आता तो भारतासाठी 118 कसोटी खेळला आहे. या सामन्यांच्या 201 डावांमध्ये कोहलीने 47.83 च्या सरासरीने 9040 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 29 शतके आणि 31 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 254* धावा आहे.
काही दिवसांपूर्वी विराट कोहली जेव्हा ऑस्ट्रेलियाला पोहोचला तेव्हा त्याच्यावरून ऑस्ट्रेलिया मीडियामध्ये बऱ्याच हालचाली पाहायला मिळाल्या. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी मागील काही महिन्यांमध्ये विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले. परंतु ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या संघाला इशारा दिला आहे.