Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WATCH VIDEO : 6,6,6,6,6.., तो थांबतच नव्हता! महाराजा टी20 ट्रॉफीमध्ये 23 वर्षाच्या फलंदाजाच्या बॅटने ओकली आग!  

कर्नाटक येथे सुरू असणाऱ्या महाराजा टी20 ट्रॉफी स्पर्धेत एका २३ वर्षीय सलामीवीर ओपनर लोचन गौडाने मंगलोर ड्रॅगन्सकडून वादळी खेळी केली. त्याने एका षटकात सलग 4 षटकार खेचले. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 23, 2025 | 03:20 PM
VIDEO: 6,6,6,6,6.., he just couldn't stop! 23-year-old batsman's bat bursts into flames in Maharaja's T20 Trophy!

VIDEO: 6,6,6,6,6.., he just couldn't stop! 23-year-old batsman's bat bursts into flames in Maharaja's T20 Trophy!

Follow Us
Close
Follow Us:

Maharaja T20 Trophy : आयपीएल 2026  या स्पर्धेला अजून बऱ्याच वेळ आबाकी आहे. आयपीएलचे त्याआधी लिलाव पार पडणार आहे. आयपीएल 2026  च्या लिलाव आधीच देशात युवा खेळाडूंनी आपल्या खेळाच्या शैलीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा सपाटा लावला आहे. अशातच  कर्नाटक येथे सुरू असणाऱ्या महाराजा टी20 ट्रॉफी स्पर्धेत एका 23 वर्षीय खेळाडूचा जलवा बघायला मिळाला. युवा सलामीवीर ओपनर लोचन गौडाने मंगलोर ड्रॅगन्सकडून खेळताना स्फोटक फलंदाजी केली. या सामन्याबद्दल आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : Deepti Sharma Birthday : भारतीय महिला संघाचा कणा दीप्ती शर्मा! केले आहेत ‘हे’ मोठे कारनामे

मैसूरमध्ये शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी महाराजा ट्रॉफीचा 24 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात  शिवमोगा लायंस आणि मंगलोर ड्रॅगन्सच्या हे दोन संघ आमने-सामने उभे ठाकले होते. ड्रॅगन्स संघाने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 200 धावा उभारल्या. 23 वर्षाचा युवा ओपनर लोचन ड्रॅगन्सला 200 धावांपर्यंत पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आपल्या संघासाठी सर्वाधिक 32 चेंडूत 63 धावांची वादळी खेळी खेळली.

‘या’ गोलंदाजाची केली धुलाई

सलामीवीर लोचनने आपला आक्रमक अंदाज दाखवला. त्याने 11 व्या ओव्हरमध्ये लायन्सचा गोलंदाज डी अशोक या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. लोचनने या ओव्हरची सुरुवातच षटकार ठोकून केली. त्याने या षटकामध्ये सलग 4 षटकार लगावले. पाचव्या चेंडूवर फक्त 2 धावा काढता आल्या. पण ओव्हरचा शेवट त्याने षटकार लगावूनच केला.  लोचनने या षटकात  5 षटकार आणि 2 धावा काढून  32 धावा लुटल्या. लोचनने इनिंगमध्ये एकूण 63 धावा केल्या. या निम्म्या 32 धावा एकाच ओव्हरमध्ये कुटल्या.

 

6️⃣ 6️⃣ 6️⃣ 6️⃣ 6️⃣

Lochan Gowda ಒಬ್ಬ ಭವಿಷ್ಯದ ಸೂಪರ್‌ಸ್ಟಾರ್ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಅವರ ಸಿಡಿಲಬ್ಬರದ ಸಿಕ್ಸರ್‌ಗಳೇ ಸಾಕ್ಷಿ. 👑

📺 ವೀಕ್ಷಿಸಿ | Maharaja Trophy KSCA T20 | Shivamogga vs Mangalore | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡದಲ್ಲಿ.#MaharajaTrophyOnJioStar #MaharajaTrophy pic.twitter.com/G68u1RZs38

— Star Sports Kannada (@StarSportsKan) August 22, 2025

हेही वाचा : Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर

शेवटच्या षटकात रंगला थरार

सलामीवीर लोचनच्या या खेळीनंतर विरोधी टीम लायन्सच्या फलंदाजाने अजून एका वादळी खेळींची पर्वणी दिली.  मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लायन्सचा सलामीवीर तुषार सिंहने दमदार सुरुवात करत त्याने 48 चेंडूत 89 धावा फटकावल्या.  त्याच्या इनिंगमध्ये 7 सिक्स आणि 6 चौकारांचा समावेश होता.  त्याशिवाय हार्दिक राजने 14 चेंडूत 32 धावा करुन टीमला विजयाच्याजवळ आणून पोहोचवले होते. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर लायन्सला विजयासाठी 6 धावांची गरज होती. पण तो चेंडू निर्धाव गेल्याने मंगलोर ड्रॅगन्सचा 5 धावांनी विजय झाला.

Web Title: Watch video opener lochan gowdas stormy innings maharajas t20 trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 03:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.