दीप्ती शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Deepti Sharma Birthday : भारतीय महिला क्रिकेट संघाची महत्वाची खेळाडू दीप्ती शर्मा आज २३ ऑगस्ट रोजी आपला २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माचा जन्म २४ ऑगस्ट १९९७ रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला. दीप्तीने वयाच्या ९ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. डावखुऱ्या मध्यम श्रेणीची फलंदाज आणि उजव्या हाताची ऑफ-स्पिन गोलंदाज दीप्ती शर्माने २०१४ मध्ये आपल्या वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय एकदिवसीय संघातमध्ये पदार्पण केले. २०१६ मध्ये शर्माने टी-२० मध्ये पदार्पण केले आणि २०२१ मध्ये कसोटी पदार्पण केले.
दीप्ती शर्मा ही भारतीय संघासाठी नेहमीच एक विश्वासार्ह खेळाडू राहिली आहे. तिने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये अनेक वेळा भारतीय संघाला अडचणींमधून बाहेर काढण्याची मोठी कामगिरी केली आहे. केवळ संघाला अडचणींमधूनच बाहेर काढले नाही तर संघाला एकहाती विजय देखील मिळवून दिला आहे.
दीप्तीने भारतीय संघाकडून खेळताना ५ कसोटी सामन्यांमध्ये ४ अर्धशतकांसह ३१९ धावा फटकावल्या आहेत आणि २० विकेट्स देखील घेतल्या आहेत. १०९ एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने २,३९२ धावा काढून १६ बळी देखीलक टिपले आहेत. ज्यामध्ये १ शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. १२९ टी-२० सामने खेळले असून तिने १,१०० धावा केल्या आहेत, यामध्ये तिने २ अर्धशतक लागावळी असून १४७ बळी देखील घेतले आहेत.
दीप्ती केवळ महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सची कर्णधार नाही तर ‘बीबीएल’ आणि ‘द हंड्रेड’ मध्ये देखील खेळत असते. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय महिला संघासाठी सर्वाधिक वैयक्तिक खेळी खेळण्याचा विक्रम देखील दीप्ती शर्माच्या नावावर जमा आहे.
२०१७ मध्ये, तिने आयर्लंडविरुद्ध खेळताना १८८ धावांची खेळी साकारली होती. एकदिवसीय सामन्यांमध्ये वैयक्तिक सर्वात मोठी खेळी आहे. तसेच गोलंदाजीमध्ये दीप्ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी देखील केली आहे. २०१६ मध्ये, तिने श्रीलंकेविरुद्ध २० धावा देऊन ६ बळी घेतले आहेत.
हेही वाचा : Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर
दीप्ती शर्माने कसोटी क्रिकेटमध्येही मोठी कामगिरी केली आहे. तिने कसोटीमध्ये सलग चार अर्धशतके झळकावली आहेत. ती भारतासाठी सर्वाधिक ९१ टी-२० सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दीप्ती दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तिच्या कामगिरीमुळे उत्तर प्रदेश सरकारने जानेवारी २०२५ मध्ये तिला डीएसपी पदावर नियुक्त केले आहे.