फोटो सौजन्य - Press Conference सोशल मीडिया
Pakistan captain Salman Ali’s statement after the defeat : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अत्यंत लज्जास्पद कामगिरीनंतर, पाकिस्तान संघ आता न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आजपासून पाच सामन्याची T२० मालिका सुरु झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना आज पार पडला. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तान संघ नवीन कर्णधार आणि काही नवीन खेळाडूंसह न्यूझीलंड दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची कमान सलमान अली आगा यांच्याकडे आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान न्यूझीलंडकडून पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
या पराभवानंतर पाकिस्तानचा नवा कर्णधार सलमान अली यांचे एक विधान समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी पराभवाचे कारण स्पष्ट केले आहे. पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. या दौऱ्यात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान संघाबाहेर आहेत. पराभवानंतर, संघाचे नवे कर्णधार सलमान अली आगा म्हणाला की, “हे कठीण होते, आम्ही अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलो नाही, परंतु आम्हाला (ड्युनेडिनपूर्वी) पुन्हा संघटित होण्याची आवश्यकता आहे.” न्यूझीलंडच्या संघाने खरोखरच चांगली गोलंदाजी केली, चांगल्या क्षेत्रात, शिवणाची थोडी हालचाल देखील होती.”
पुढे तो म्हणाला, “आम्ही बसू, बोलू आणि पुढच्या सामन्याबद्दल विचार करू. आमच्याकडे तीन पदार्पण करणारे खेळाडू होते, ते जितके जास्त सामने खेळतील तितके ते शिकतील. न्यूझीलंडमध्ये नवीन चेंडू थोडा प्रभावी ठरतो, आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि आम्ही पुढील सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.”
🚨Salman Ali Agha: “It was a tough game, but we gave our best. New Zealand’s bowlers were excellent, especially in the powerplay. We couldn’t capitalize but will regroup quickly. With just a day before the next match, we’ll reassess and improve. The debutants will learn and adapt… pic.twitter.com/c84Dd2hPrU
— Syed Ahmed Raza (@ARazaRiz90) March 16, 2025
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव १८.४ षटकांत फक्त ९१ धावांवर संपला. ८ पाकिस्तानी फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानकडून खुसदिलने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना जेकबने ४ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, न्यूझीलंडने हे सोपे लक्ष्य १०.१ षटकात १ गडी गमावून पूर्ण केले. आता पुढील सामना मंगळवारी १८ मार्च रोजी होणार आहे यामध्ये मालिकेमध्ये कमबॅक करण्याची संधी असणार आहे.