
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Live streaming of Rohit Sharma-Virat Kohli match : भारतीय संघाची पुढील मालिका ही न्यूझीलंडविरुद्ध खेळवली जाणार आहे. ही मालिका जानेवारी म्हणजेच नवीन वर्षी होणार आहे. त्याआधी भारतामध्ये देशांतर्गत सामने खेळवले जात आहेत. विजय हजारे ट्राॅफीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील. भारतीय संघातील दोन्ही स्टार खेळाडू फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतात आणि त्यांचा फॉर्म कायम ठेवण्यासाठी बीसीसीआयने त्यांना ५० षटकांच्या स्थानिक स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे.
रोहित आणि विराट दोघांच्याही उपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये स्पर्धेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हिटमॅन आणि द किंग या स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळतील असे वृत्त आहे. त्यांचे सामने कधी, कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घेऊया.
रोहित शर्माचा मुंबईच्या विजय हजारे ट्रॉफी संघात समावेश करण्यात आला आहे आणि एमसीएने स्पष्ट केले आहे की तो फक्त दोन सामन्यांसाठी उपलब्ध असेल. मुंबईचा पहिला सामना उद्या, २४ डिसेंबर रोजी सिक्कीमविरुद्ध आहे. रोहित शर्मा तिथे खेळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर २६ डिसेंबर रोजी मुंबईचा सामना उत्तराखंडशी होईल. हा रोहितचा स्पर्धेतील शेवटचा सामना असू शकतो.
रोहित शर्माप्रमाणेच विराट कोहलीही पहिले दोन सामने खेळेल. दिल्लीचा पहिला सामना २४ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशविरुद्ध आणि दुसरा सामना २६ डिसेंबर रोजी गुजरातविरुद्ध आहे. विराट कोहली दोन्ही सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विराट दिल्लीकडून विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे, जी स्वतःच एक मोठी गोष्ट आहे.
🚨 Hi @JioHotstar, kindly telecast Mumbai vs Sikkim VHT match. Millions of Rohit Sharma fans are eagerly waiting to see the Hitman back in action and every glimpse of his game is very precious for the fans. pic.twitter.com/asFvXCNum9 — Vishal. (@SPORTYVISHAL) December 23, 2025
रोहित शर्मा आणि विराट कोहली २४ आणि २६ डिसेंबर रोजी एकमेकांशी खेळतील. त्यांचे सामने थेट प्रक्षेपित केले जातील. विजय हजारे ट्रॉफीचे सर्व सामने सकाळी ९ वाजता सुरू होणार आहेत. दोन्ही दिग्गज स्टार असलेले सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येतील. याव्यतिरिक्त, सामने जिओहॉटस्टारवर स्ट्रीम करता येतील.