फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सूर्यकुमार यादवचा विक्रम : भारताचा संघ सध्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली सध्या इंग्लडविरुद्ध मालिका खेळत आहे. २०२४ T२० विश्वचषकामध्ये भारताच्या संघाने विश्वचषक जिंकला त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेमध्ये T२० मधून निवृत्तीची घोषणा केली. त्यांनतर T२० भारतीय संघाचा कार्यभार सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टी-२० सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव मालिकेतील आपली आघाडी दुप्पट करण्याचे आणि माजी कर्णधार रोहित शर्माच्या दिग्गज क्लबमध्ये सामील होण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. कोलकात्यात खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने खाते न उघडता बाद झाला होता, पण त्याला चेन्नईत मोठी खेळी खेळायला आवडेल. जर सूर्यकुमार यादवने आज ५ षटकार दुसऱ्या सामन्यात मारले तर तो T२० मध्ये १५० षटकार पूर्ण करेल आणि रोहित शर्मानंतर असे करणारा दुसरा भारतीय असेल.
MS Dhoni : माजी क्रिकेटपटूने एमएस धोनीवर केले गंभीर आरोप, म्हणाला – मला यामुळेच निवृत्ती घ्यायची…
T२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. या हिटमॅनने आपल्या कारकिर्दीत खेळलेल्या १५९ सामन्यांच्या १५१ डावांमध्ये २०५ गगनचुंबी षटकार ठोकले आहेत. जागतिक क्रिकेटमधील तो एकमेव खेळाडू आहे ज्याच्या नावावर २०० पेक्षा जास्त T२० षटकार आहेत.
रोहितशिवाय आणखी दोन खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर १५० हून अधिक षटकार आहेत. या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आणि यूएईचा मोहम्मद वसीम यांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवशिवाय इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरही आज १५० षटकारांचा आकडा गाठू शकतो. बटलरच्या नावावर T२० मध्ये १४८ षटकार आहेत. तो १५० षटकारांच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून फक्त दोन शॉट्स दूर आहे.
रोहित शर्मा- २०५
मार्टिन गप्टिल- १७३
मोहम्मद वसीम- १५८
निकोलस पूरन- १४९
जोस बटलर- १४८
सूर्यकुमार यादव- १४५
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ७९ टी-२० सामने खेळले आहेत ज्यात त्याने ४०.१५ च्या सरासरीने आणि १६७.५३ च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने २५७० धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने १४५ षटकारांसह २३३ चौकार मारले आहेत.
भारताचा संघ T२० मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध तीन सामान्यांची मालिका खेळणार आहे. ही चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी भारताच्या संघाची एकमेव मालिका असणार आहे. भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीसाठी १५ खेळाडूंची घोषणा केली आहे. टीम इंडिया रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेमध्ये मैदानात उतरणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे पण भारताचा संघ काही कारणास्तव पाकिस्तानमध्ये जाणार नाही त्यामुळे स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीचे सर्व सामने भारताचा संघ युएईमध्ये खेळणार आहे.