
IPL 2026: Rishabh Pant became the most expensive player on this day! The record bid was 27 crores in IPL 2025..
Rishabh Pant, the most expensive player of IPL 2025 : आता आयपीएल २०२६ च्या १९ हंगामचे वेध लागले आहे. आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे पार पडणार आहे. सर्व फ्रँचायझींकडून त्यांच्या रिटेन केलेल्या आणि रिलीज झालेल्या खेळाडूंच्या यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार ऋषभ पंत चर्चेत आला आहे, जो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याने याच दिवशी हा ऐतिहासिक विक्रम केला.
मागील वर्षी २४ नोव्हेंबर २०२४ रोजी, आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आयोजित करण्यात आला होता. याच दिवशी लखनौ सुपर जायंट्सने भारतीय विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतसाठी २७ कोटी रुपयांची मोठी बोली लावली होती. ही आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली ठरली होती. इतकी रक्कम कोणत्याही खेळाडूला कधीही मिळालेली नाही.
त्याच आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंना मोठ्या बोली लावण्यात आलोय होत्या. पंजाब किंग्जने भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरसाठी २६.७५ कोटी रुपये मोजले होते. तर कोलकाता नाईट रायडर्सने वेंकटेश अय्यरला २३.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. या तीन खेळाडूंच्या खरेदीमुळे तो लिलाव आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा ठरला होता.
आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे ऋषभ पंतचा २७ कोटी रुपयांचा विक्रम मोडला जाऊ शकतो का? क्रिकेट तज्ज्ञांचा असा विश्वास व्यक्त केला आहे की २६ वर्षीय ऑस्ट्रेलियन स्टार अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन या विक्रमाला आव्हान देण्याची शक्यता आहे. ग्रीनची अष्टपैलू क्षमता, स्फोटक फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजी त्याला फ्रँचायझींसाठी सर्वोच्च पसंती बनवू शकते. त्याने आतापर्यंत २९ आयपीएल सामन्यांमध्ये ७०७ धावा केल्या आहेत आणि १६ विकेट्स काढल्या आहेत. त्याची बहुमुखी प्रतिभा त्याला या लिलावात सर्वात महागडा खेळाडू बनवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात अनेक विक्रम लिहिले जाऊ शकतात. ऋषभ पंतचा विक्रम अबाधित राहील की ग्रीन तो मोडू शकेल? क्रिकेट चाहत्यांना १६ डिसेंबर रोजी याचे उत्तर मिळू शकणार आहे. या आयपीएल हंगामात खेळाडूंच्या बाजारपेठेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.