कुलदीप यादव(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : Dharmendra passway : “तुम्ही फक्त उंचीनेच नव्हे तर…”, शिखर धवनने ‘हि-मॅन’ धर्मेंद्रला दिला अखेरचा निरोप
या शेवटच्या कसोटी सामन्यात भारत कठीण परिस्थितीतून जात होता, तेव्हा मात्र कुलदीपची संयमी फलंदाजी सामन्यातील सर्वात मोठी आकर्षण ठरली. भारतीय डाव गोंधळलेल्या स्थितीत असताना तो कुलदीप यादव क्रीजवर आला. वॉशिंग्टन सुंदर (४८) सोबत, त्याने एक मोठी जबाबदारी स्वीकारलीआणि हळूहळू भारताला ढासळण्यापासून वाचवले.
कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरने २०८ चेंडूत आठव्या विकेटसाठी ७२ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. यादरम्यान, कुलदीप एका अनुभवी कसोटी फलंदाजाप्रमाणे भूमिका बजावताना दिसून आला. त्याने १३४ चेंडूत १९ धावा केल्या आणि तीन शानदार चौकार देखील मारले. दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या तरी देखील कुलदीप शांत आणि संयमी दिसून आला. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील त्याची सर्वात मोठी खेळी ठरली आहे. यापूर्वी, त्याने २०२४ मध्ये रांची कसोटीत इंग्लंडविरुद्ध १३१ चेंडूत २८ धावा फटकावल्या होत्या.
४८९ धावांच्या प्रत्युत्तरात भारत २०१ धावांवर सर्वबाद झाला. या दरम्यान कुलदीपची संयमी खेळी आजच्या दिवसातील सर्वात सकारात्मक क्षण होता. तसेच, यावेळी सोशल मीडियावर एक नवीन आकडेवारी व्हायरल झाली. २०२२ च्या बांगलादेश मालिकेपासून, कुलदीपने भारताच्या अनेक आघाडीच्या फलंदाजांपेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला. चेंडूंचा सामना करण्याच्या सरासरीच्या बाबतीत, कुलदीप विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि नितीश रेड्डी यांच्या पुढे निघाला आहे.
या कसोटी मालिकेत आतापर्यंत केवळ दोनच भारतीय फलंदाजांनी एका डावात १०० पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला आहे. केएल राहुलने एकूण ११९ चेंडूंचा सामना केला आणि ३९ धावा काढल्या आहेत. यावरून असे दिसून येते की भारताच्या खालच्या फळीतील खेळाडूची ही खेळी टॉप ऑर्डरवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात असून गुवाहाटी येथे या मालिकेतील दूसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाई करत ४८९ धावा उभ्या केल्या होत्या. प्रतिउत्तरात भातीय संघाला सर्वबाद २०१ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने २८८ धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विनानुकसान २६ धावा करत ३१४ धावांची आघाडी घेत सामन्यावर भक्कम आघाडी घेतली आहे.दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर एडेन मार्कराम (१२) आणि रायन रिकेल्टन (१३) क्रीजवर नाबाद आहेत.






