आसाम : रविवारी २ ऑक्टोबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका (India Vs South Africa) यांच्यामध्ये टी २० मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी कमालीची खेळी करत १६ धावांनी हा सामना जिंकला. या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली असून भारताने बऱ्याच वर्षांनी मायभूमीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय मिळवला.
गुवाहाटीधील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळलेलय सामन्यात भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली. रोहित ४३ धावा करुन तर केएल राहुल अर्धशतक पूर्ण करुन ५७ धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारने ६१ धावांची खेळी केली. तर विराट कोहली देखील ४९ धावांवर नाबाद राहिला.
कार्तिकनेही नाबाद १७ धावा करत भारताची धावसंख्या २३७ पर्यंत पोहोचवली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २० षटकांत २३८ धावा करण्याचे आव्हान होते. मात्र या दरम्यान विराट कोहलीचे अर्धशतक अवघ्या एका धावामुळे हुकले. यावरून शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना विराट कोहलीला अर्धशतकपूर्ण करण्यासाठी स्ट्राईक का दिली नाही? अशी चर्चा सोशल मीडियात रंगू लागली. मात्र यावर दिनेश कार्तिकने आता खुलासा केला आहे.
दिनेश कार्तिक म्हणाला, विराटला अर्धशतकासाठी १ रन हवाय ही गोष्ट त्याच्या डोक्यात सुरु होती. शेवटच्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर षटकार मारल्यानंतर तो विराटकडे आला आणि स्ट्राईक रोटेट करण्यासाठी सांगितलं. पण विराटने कुठलाही स्वार्थ न ठेवता देशाचा विचार करत कार्तिकला स्ट्राईक रोटेट करण्यासाठी नकार दिला. उरलेल्या ओव्हरमध्ये जमेल तितक्या चेंडूत रन्सच करण्यास त्याने कार्तिकला सांगितलं. त्यावेळी कार्तिकने पुढच्याच बॉलवर आणखी एक षटकार ठोकला. त्यामुळे भारतीय संघाने शेवटच्या ओव्हरमध्ये १८ धावा काढले आणि दक्षिण आफ्रिकेला २३८ धावांच लक्ष्य दिलं.
दिनेश कार्तिकने याबाबत खुलासा केल्यानंतर चाहते विराट कोहलीच्या दिलदारपणावर फिदा झाले आहेत.