फोटो सौजन्य - JIO Cinema
गौतम गंभीर-अजित आगरकर यांची पत्रकार परिषद : भारताचा संघ २७ जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. भारताचा संघ गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये पहिल्यांदा खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्याचबरोबर हार्दिक पांड्याला कर्णधार न बनवण्याचे कारण देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. श्रीलंका दौऱ्यामध्ये T२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला कर्णधारपदाची कमान सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात निवडकर्ता अजित आगरकर यांनी मोठा खुलासा केला आहे त्याचबरोबर पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले आहे.
निवडकर्ता अजित आगरकर यांना विचारण्यात आले की, हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी का निवड करण्यात आली. यावर अजित आगरकर म्हणाले की, “एक कर्णधार असावा जो जास्तीत जास्त सामने खेळला असेल. त्यामुळेच सूर्यकुमारला कर्णधार बनवण्यात आले आहे. हार्दिकचा विचार केला तर तो आमच्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या फिटनेसचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी चांगली कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे. त्याने चांगली कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे. सूर्यकुमारकडे कर्णधारपदासाठी आवश्यक क्षमता होती. अजून दोन वर्षांची प्रतीक्षा आहे. या काळात आम्ही हार्दिकला चांगले सांभाळू शकतो, असे आम्हाला वाटते.
पुढे अजित आगरकर म्हणाले की, केएल बराच काळ T२० संघाचा भाग नाही. जेव्हा हार्दिकला दुखापत झाली, त्यामुळे आम्ही काळजीत होतो. रोहित खेळत होता, हा एक मोठा दिलासा होता. शुभमन आता तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे. हे आवश्यक नाही की आम्ही कर्णधार शोधत आहोत. ऋषभ बऱ्याच दिवसांपासून बाहेर आहे. म्हणूनच आम्ही त्याला कोणत्याही ओझ्याशिवाय परत आणू इच्छित. बऱ्याच काळानंतर परत आलेल्या प्रत्येकासाठी, तुम्हाला त्यांना हळूहळू योजनेमध्ये परत आणण्याची आवश्यकता आहे.