Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज पहिल्या ग्रुप सी सामन्यात वेस्ट इंडिजनेस्कॉटलंडचा ३५ धावांनी धूळ चारून पहिला विजय नोंदवला.या सामन्यात रोमारियो शेफर्डने हॅटट्रिकसह ५ विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 07, 2026 | 09:34 PM
WI vs SCO: 4 wickets in a single over! Romario Shepherd achieves a great feat by taking a T20 World Cup hat-trick! The first bowler to accomplish 'this' feat for West Indies.

WI vs SCO: 4 wickets in a single over! Romario Shepherd achieves a great feat by taking a T20 World Cup hat-trick! The first bowler to accomplish 'this' feat for West Indies.

Follow Us
Close
Follow Us:

Romario Shepherd takes a hat-trick in the T20 World Cup : वेस्ट इंडिजने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली. पहिल्या ग्रुप सी सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडचा ३५ धावांनी धूळ चारून विजय नोंदवला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजच्या विजयाचा नायक अष्टपैलू रोमारियो शेफर्डने महत्त्वाची भूमिका वठवली. या सामन्यात शेफर्डने हॅटट्रिकसह ५ विकेट्स घेऊन स्कॉटलंड संघाचे कंबरडे मोडले.

हेही वाचा :WI vs SCO, ICC T20 World Cup 2026 : W,W,W…शेफर्डच्या हॅट-ट्रिकसह पंजासमोर स्कॉटलंड धाराशाही! वेस्ट इंडिजचा ३५ धावांनी विजय

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही दहावी हॅटट्रिक ठरली. तसेच, शेफर्ड हा पराक्रम करणारा एकूण नववा गोलंदाज आहे. रोमारियो शेफर्डने वेस्ट इंडिजच्या विजयात बॅटने नव्हे तर चेंडूने महत्त्वाची भूमिका पार पडली. एका षटकात त्याने ४ गडी माघारी पाठवले. ज्यामध्ये हॅटट्रिकचा देखील समावेश आहे. रोमारियो शेफर्ड हा टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात वेस्ट इंडिजसाठी हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज आणि एकूण नववा गोलंदाज ठरला.

टी-२० विश्वचषकात पहिली हॅटट्रिक ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने घेण्याची किमया साधली होती. २००७ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या आवृत्तीत ब्रेट लीने बांगलादेशविरुद्ध हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. २०२१ मध्ये आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने नेदरलँड्सविरुद्ध दुसरी हॅटट्रिक घेतली. तर २०२१ च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरी हॅटट्रिक घेतली होती. २०२१ च्या विश्वचषकात कागिसो रबाडाने इंग्लंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली, जी टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील चौथी हॅटट्रिक ठरली होती.

That #T20WorldCup hat-trick feeling 🫶 Swipe 👈 to watch Romario Shepherd’s wickets en route to the milestone 💥 Tournament broadcast details in our bio 📺 pic.twitter.com/ELPeqBBVkq — ICC (@ICC) February 7, 2026

२०२२ च्या टी-२० विश्वचषकात, यूएईच्या कार्तिक मयप्पनने श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. तर आयर्लंडच्या जोश लिटलने न्यूझीलंडविरुद्ध हॅटट्रिक घेण्याची किमया साधली होती. हॅटट्रिक घेणारा मयप्पन पाचवा आणि लिटल सहावा गोलंदाज ठरला होता. सतेच  २०२४ च्या टी-२० विश्वचषकात तीन हॅटट्रिक घेतल्या गेल्या होत्या. पॅट कमिन्सने दोन वेळा हॅटट्रिक घेण्याची किमया साधली. त्याने बांगलादेशविरुद्ध पहिली आणि अफगाणिस्तानविरुद्ध दुसरी हॅटट्रिक चटकावली होती. कमिन्स टी-२० विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा सातवा गोलंदाज ठरला होता.

हेही वाचा : T20 World Cup LIVE : वानखेडेवर टॉप ऑर्डरने टाकली नांगी! सूर्याच्या खेळीने राखली लाज; भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य

तसेच, २०२४ मध्ये इंग्लंडच्या क्रिस जॉर्डनने अमेरिकेविरुद्ध टी-२० विश्वचषकात नववी हॅटट्रिक घेतली होती. जॉर्डन हॅटट्रिक घेणारा आठवा गोलंदाज बनला  होता. तसेच, चालू टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये  रोमारियो शेफर्डने आता स्कॉटलंडविरुद्ध नववा गोलंदाज म्हणून यादीत आपले नाव पक्के केले.

Web Title: Wi vs sco romario shepherd made history for west indies by taking a t20 world cup hat trick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 09:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.