भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
IND vs USA, T20 World Cup 2026 : आजपासून सुरू झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका आमनेसामने आले आहेत. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर ९ गडी गमावून १६१ धावा केल्या आहेत. अमेरिकेला विजय मिळवण्यासाठी १६२ धावा कराव्या लागणार आहेत. अमेरिकेकडून शेडली व्हॅन शाल्कविकने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी अमेरिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मोनांक पटेलचा हा निर्णय अमेरिकेच्या गोलंदाजांनी सार्थक ठरवला. भारताचा संघ आपली सुरुवात चांगली करू शकला नाही. भारताने दुसऱ्याच षटकात ८ धावांवरच आपला पहिला गडी गमावला. भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा भोपळा न फोडताच माघारी गेला. त्याला अली खानने बाद केले.
त्यानंतरही भारताची टॉप ऑर्डर झटपट बाद झाली. भारताने ६ ओव्हरमध्ये ४६ धावांवर आपल्या ४ विकेट्स गमावल्या. इशान किशन १६ चेंडूत २० धावा, तिलक वर्मा १६ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २५ धावा आणि शिवम दुबे ० धावा करून बाद झाले. भारत ६ ओव्हरमध्ये ४६ धावा अशा नाजुक परिस्थितीमध्ये पोहचला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव एक बाजूने डाव सावरत होता. परंतु, भारताच्या विकेट्स एक बाजूने जात होत्या. रिंकू सिंग देखील जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही. तो १४ चेंडूत ६ धावा करून बाद झाला हार्दिक पंड्याकडून अपेक्षा होत्या परंतु तो देखील झटपट बाद झाला. पंड्या ५ धावा करून बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने १४ धावा करून बाद झाला.
Innings Break! Captain Surya Kumar Yadav’s terrific 8⃣4⃣*(49) propel #TeamIndia to 1⃣6⃣1⃣ 👌👌 Over to our bowlers 🙌 Scorecard ▶️ https://t.co/Rlm2ARPnOV#MenInBlue | #T20WorldCup | #INDvUSA pic.twitter.com/6cI4ctXIVk — BCCI (@BCCI) February 7, 2026
दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरली आणि त्याने आपले अर्धशतक केले. त्यानंतर र्शदीप सिंग ४ धावा करून बाद झाला. अर्धशतक ठोकल्यावर सूर्या अधिक घातक झालेला दिसून आला. त्याने भारताला संकटातून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु, त्याला इतर खेळाडूंकडून चांगली साथ मिळाली नाही. सूर्याने भारताला १६१ पर्यंत पोहचवले आणि तो ४९ चेंडूत ८४ धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने १० चौकार आणि ४ षटकार लगावले. तर वरुण चक्रवर्ती ० धावांवर धावबाद झाला. अमेरिकेकडून शेडली व्हॅन शाल्कविकने सर्वाधिक ४ तर हरमीत सिंगने २ विकेट्स घेतल्या. तसेच अली खान आणि मोहम्मद मोहसीन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. अजून ५ ओव्हर शिल्लक असून भारताकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे.
भारत इलेव्हन : इशान किशन (w), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका प्लेइंग इलेव्हन: अँड्रिज गॉस (डब्ल्यू), सैतेजा मुक्कामल्ला, मोनांक पटेल (क), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्कविक, अली खान, सौरभ नेत्रावलकर






