WI vs SCO, स्कॉटलंडवर वेस्ट इंडिजचा ३५ धावांनी विजय(फोटो-सोशल मीडिया)
ICC T20 World Cup 2026 : आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आजपासून सुरुवात झाली. या मेगा स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजने स्कॉटलंडचा ३५ धावांनी पराभव केला. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत शिमरॉन हेटमायरच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ गडी गमावून स्कॉटलंडसंघासमोर १८३ धावांचे लक्ष्य दिले होते. धावांचा पाठलाग करणारा स्कॉटलंड संघ रोमारियो शेफर्डच्या ५ विकेट्समुळे १८.५ षटकात १४७ धावांवर गारद झाला.
टॉस गामावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत ५ गडी १८२ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने ३६ चेंडूत ६४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि ६ षटकार लगावले. तसेच ब्रँडन किंग ३० चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३५ धावांचे योगदान दिले. शेर्फेन रदरफोर्डने आक्रमक खेळ दाखवत १३ चेंडूत २६ धावा केल्या. स्कॉटलंडकडून ब्रॅड करीने २ विकेट्स घेतल्या, तर सफ्यान शरीफ, मायकेल लीस्क आणि ऑलिव्हर डेव्हिडसन, यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करायला उतरेलल्या स्कॉटलंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाच्या ३७ धावांवर ३ विकेट्स गेल्या.जॉर्ज मुन्से १९ धावा, ब्रँडन मॅकमुलन १४ धावा, मायकेल जोन्स १ धावा करून झटपट माघारी गेले. त्यानंतर कर्णधार रिची बेरिंग्टन आणि टॉम ब्रुस या दोघांनी ७८ धावांची भागीदारी रचून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ४२ चेंडूत ६९ धावांची गरज होती आणि स्कॉटलंड सामना जिंकण्याच्या स्थितीत आहे असे वाटत होते. पण होल्डरने बेरिंग्टनला बाद केले आणि त्यानंतर ११५/४ वरून स्कॉटलंडचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
Romario Shepherd snaps the first hat-trick of #T20WorldCup 2026 🔥 Follow his exploits at the tournament LIVE, broadcast details 📺 https://t.co/NPykWM6SBq pic.twitter.com/LyaItIp6lc — ICC (@ICC) February 7, 2026
शेफर्डने हॅट-ट्रिक घेऊन आणि सामना लवकरच संपला. रिची बेरिंग्टन ४२ धावा करून बाद झाला तर आणि टॉम ब्रुस ३५ धावांवर माघारी गेला. मार्क वॉट ११,सफ्यान शरीफ ०, मायकेल लीस्क ०, ऑलिव्हर डेव्हिडसन ० धावांवर बाद झाले. तर ब्रॅड करी २ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्डने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर जेसन होल्डरने ३ विकेट्स काढल्या. तसेच गुडाकेश मोती आणि शमार जोसेफ यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. परिणामी वेस्ट इंडिजने ३५ धावांनी विजय मिळवत स्पर्धेत विजयी सुरवात नोंदवली.
स्कॉटलंड प्लेइंग इलेव्हन : जॉर्ज मुन्से, मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), ब्रँडन मॅकमुलन, मायकेल जोन्स, टॉम ब्रुस, रिची बेरिंग्टन (कर्णधार), मायकेल लीस्क, ऑलिव्हर डेव्हिडसन, मार्क वॉट, ब्रॅड करी, सफ्यान शरीफ
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेर्फेन रदरफोर्ड, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसेन, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, शमार जोसेफ






