
WI vs SCO, T20 World Cup 2026 Live: Hetmyer's fighting innings at Eden Gardens! West Indies set a target of 183 runs for Scotland.
ICC T20 World Cup 2026 : आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आजपासून सुरू झाली आहे. या मेगा स्पर्धेतील दूसरा सामना स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत शिमरॉन हेटमायरच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ गडी गमावून १८२ धावा करून स्कॉटलंडसंघासमोर १८३ धावांचे लक्ष्य दिले आहे. स्कॉटलंडकडून ब्रॅड करीने २ विकेट्स घेतल्या आहेत.
कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत असलेल्या( टी२० विश्वचषक २०२६) सामन्यात स्कॉटलंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर वेस्ट इंडिज संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. ब्रँडन किंग आणि शाई होप या सलामीवीरांनी वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी ८.२ षटकात ५४ धावांची भागीदारी रचली. कर्णधार शाई होप१९ धावा करून बाद झाला. त्यानंतर शिमरॉन हेटमायर मैदानात आला. थोड्यावेळातच ब्रँडन किंग ३० चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३५ धावा करून माघारी गेला.
Shimron Hetmyer’s quickfire fifty leads the West Indies charge 🙌 It’s our very first @marriottbonvoy Milestones of the tournament 👌 pic.twitter.com/9bmja4ubFI — ICC (@ICC) February 7, 2026
कर्णधार माघारी गेल्यावर मात्र शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल यांनी संघाचा डाव सावरला. दरम्यान शिमरॉन हेटमायर २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी ८१ धावांची भागीदारी रचली. परंतु, रोव्हमन पॉवेल १४ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्याच्या पाठोपाठ शिमरॉन हेटमायर ३६ चेंडूत ६४ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि ६ षटकार लगावले. त्याला सफ्यान शरीफने बाद केले. शेर्फेन रदरफोर्डने आक्रमक खेळ दाखवत १३ चेंडूत २६ धावा काढल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर रोमारियो शेफर्ड ६ धावांवर तर मॅथ्यू फोर्ड १ नाबाद राहून संघाला १८२ धावांपर्यंत पोहचवले. स्कॉटलंडकडून ब्रॅड करीने २ विकेट्स घेतल्या, तर सफ्यान शरीफ, मायकेल लीस्क आणि ऑलिव्हर डेव्हिडसन, यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
स्कॉटलंड प्लेइंग इलेव्हन : जॉर्ज मुन्से, मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), ब्रँडन मॅकमुलन, मायकेल जोन्स, टॉम ब्रुस, रिची बेरिंग्टन (कर्णधार), मायकेल लीस्क, ऑलिव्हर डेव्हिडसन, मार्क वॉट, ब्रॅड करी, सफ्यान शरीफ
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेर्फेन रदरफोर्ड, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसेन, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, शमार जोसेफ
बातमी अपडेट होत आहे…