अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Abhishek Sharma has a chance to set a record in the India vs. USA match : बहुप्रत्यक्षित आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला आजपासून (७ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील तिसरा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि यूएसए यांच्यात खेळला जाणार आही. या सामन्यात भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा इतिहास रचण्याची शक्यता आहे. जर अभिषेकने आजच्या सामन्यात ५ षटकार मारले तर तो भारतात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० षटकार मारणारा पाचवा फलंदाज बनणार आहे.
आतापर्यंत, अभिषेक शर्माने भारतात खेळताना टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५ षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माने भारतीय भूमीवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार लगावले आहेत. रोहित शर्माने भारतात ८५ षटकार ठोकण्याची किमया साधली आहे. या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे. तर सूर्यकुमार यादवने भारतात ८२ षटकार मारले आहेत. या यादीत हार्दिक पंड्याने ५८ आणि विराट कोहलीने भारतात खेळताना टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ५६ षटकार लगावले आहेत.
भारत संभाव्य इलेव्हन : इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह/मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
यूएसए संभाव्य इलेव्हन : अँड्रिज गॉस, सैतेजा मुक्कल्ला, शायन जहांगीर, मोनांक पटेल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मिलिंद कुमार, हरमीत सिंग, शुभम रांजणे, संजय कृष्णमूर्ती, मोहम्मद मोहसीन, शाडली व्हॅन शाल्क्विक, सौरभ नेत्रावलकर






