IPL 2025: Prithvi Shaw to replace Rituraj Gaikwad? Will try his luck as a replacement player..
IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या मध्यातच, चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. हा चेन्नईसाठी मोठा झटका मनाला जाता आहे. कारण, गायकवाड केवळ संघाचा कर्णधारच नाही तर तो एक तडाखेबाज सलामीवीर फलंदाज देखील आहे. त्यामुळे चेन्नईचे हे मोठे नुकसान मानले जाता आहे. तथापि, काही वृत्तांनुसार एक बातमी समोर आली आहे. त्याच्या जागी पृथ्वी शॉला संघात प्रवेश मिळू शकतो.
याबबत अधिक माहिती अशी की, आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात पृथ्वी शॉला कुणी खरेदी केले नव्हते. पण, आता अशी माहिती समोर येत आहे की, त्याला आयपीएल २०२५ मध्ये एन्ट्री मिळण्याची शक्यता आहे. तो चेन्नईमध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाडची जागा घेणार असल्याचे समजते. अद्याप याबाबत अधिकृत अशी कोणती घोषणा करण्यात आलेली नाही.
ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला सन त्याच्या जागी एमएस धोनी संघाची धुरा सांभाळणार आहे. त्यामुळे गायकवाडच्या जागी संघात कोण खेळाडू येणार? असा विचार चाहते करता आहेत. तर काही ठिकाणी असे वृत्त समोर आले आहे की, गायकवाडच्या जागी पृथ्वी शॉ या हंगामात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. तथापि, हा फक्त एक अंदाज आहे.
२०२५ च्या आयपीएलमधून ऋतुराज गायकवाड बाहेर पडला असून चेन्नईच्या संघाची धुरा पाच वेळा संघाला विजेता बनवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा देण्यात आली आहे. तो पुन्हा एकदा सीएसकेचे नेतृत्व करताना दिसून येणारा आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या असून अशा परिस्थितीत आता धोनी पुन्हा संघाची कमान हातात घे असल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे.
१० एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, संघाचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम बाहेर पडला आहे. गायकवाड याला कोपराला दुखापत झाली आहे आणि त्यांच्या केसांच्या हाडांना फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे तो आयपीएल 2025 चा हंगाम खेळू शकणार नाही.
आयपीएल २०२५ चा १८ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी आजवर खूप निरशजनक राहिली आहे. त्यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी स्पर्धेतील पहिला सामना जिंकला होता परंतु त्यानंतर लागोपाठ चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये तळाला म्हणजे ९ व्या क्रमांकावर आहे.